Adil Khan Girlfriend : 'या' अभिनेत्रीसाठी आदिलने खानने राखी सावंतला सोडलं? कोण आहे आदिलची गर्लफ्रेंड तनू?
'ड्रामा क्वीन' (Drama Queen) म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकतेच तिने पती आदिल खानचे विवाहबाह्य संबंध म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याचा दावा केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराखी सावंतने मीडियासमोर पती आदिल खान दुर्रानीच्या गर्लफ्रेंडचं नाव उघड केलं आहे. हे नाव समोर येताच आदिलच्या गर्लफ्रेंडचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. (PC : tanuchandel/instagram)
राखी सावंतने आरोप केला आहे की, तिचा पती आदिल एका तनू नावाच्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. (PC : tanuchandel/instagram)
त्यांच्या याच नात्यामुळे राखी आणि आदिलमध्ये दुरावा निर्माण झाल्याचंही राखीने सांगितलं आहे. (PC : tanuchandel/instagram)
त्यानंतर आता आदिलच्या कथित गर्लफ्रेंडचा फोटोही समोर आला आहे हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (PC : tanuchandel/instagram)
राखी सावंतने आरोप केला आहे की, अभिनेत्री तनू चंडेल (Tanu Chandel) आणि आदिलचं अफेअर सुरु आहे. (PC : tanuchandel/instagram)
अभिनेत्री तनू चंडेल (Tanu Chandel) ही आदिल खानची गर्लफ्रेंड असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. यानंतर आदिल आणि तनूचे फोटो व्हायरल झाले आहेत. (PC : tanuchandel/instagram)
राखीच्या म्हणण्यानुसार, तनू एक अभिनेत्री आणि बिजनेसवुमन आहे. (PC : tanuchandel/instagram)
तनू गेल्या 8 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये संघर्ष करत आहे आणि काही छोट्या प्रोजेक्टमध्येही दिसली आहे. (PC : tanuchandel/instagram)
तनू चंडेलचं वय 37 वर्षे आहे. तनू मूळची ही इंदौरची आहे. (PC : tanuchandel/instagram)
(PC : tanuchandel/instagram)
इंदौरमध्ये तनूचा एक फ्लॅटही आहे. तिच्याकडे स्वतःची बीएमडब्ल्यू कार आहे. राखीच्या म्हणण्यानुसार, तनू आयआयटीमधून पास आऊट आहे. (PC : tanuchandel/instagram)