भारतीय रणरागिणी इतिहास घडवला, ऑस्ट्रेलियाच्या नांग्या ठेचल्या
मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर रंगलेल्या कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाने आठ विकेट्स राखून विजय मिळवला. स्मृती मांधाना हिने विजयी चौकार लगावला. भारतीय महिला संघाने पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामना जिंकत इतिहास घडवला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय महिला (India Women) संघाला विजयासाठी 75 धावांचे आव्हान मिळाले होते. हे आव्हान भारताच्या पोरींनी सहज पार केले.
शेफाली वर्मा आणि रिचा घोष झटपट बाद झाल्यानंतर स्मृतीने (38) चौकार मारत भारताला सहजसोपा विजय मिळवून दिला.
भारताकडून पूजा वस्त्राकरने पहिल्या डावात 4 बळी घेतले. तिने 16 षटकात 53 धावा दिल्या. तर स्नेह राणाने 22.4 षटकात 56 धावा देत 3 बळी घेतले. दीप्ती शर्माने 2 बळी घेतले. स्नेहने दुसऱ्या डावात 4 बळी घेतले. तिने 22 षटकात 63 धावा दिल्या. राजेश्वर गायकवाड आणि हरमनप्रीतनेही प्रत्येकी दोन गडी बाद केले. पूजाला एक विकेट मिळाली.
पहिल्या डावात 219 धावा करून ऑस्ट्रेलियन संघ गडगडला. पहिल्या डावात ताहिलाने अर्धशतक झळकावले. दुसऱ्या डावात 261 धावा करून ऑस्ट्रेलियन संघ गडगडला. ताहिलाने दुसऱ्या डावातही 177 चेंडूंचा सामना करत 73 धावा केल्या. या कालावधीत 10 चौकार मारले. संघासाठी एलिस पेरीने 45 धावांचे योगदान दिले.
प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात 406 धावा केल्यानंतर दुसऱ्या डावात अवघ्या 75 धावांचे टार्गेट 2 गडी गमावून पूर्ण केले. स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्ज, रेणुका सिंग आणि स्नेह राणा यांनी भारतासाठी चमकदार कामगिरी केली.