जय शाह यांच्यानंतर बीसीसीआयचे सचिव कोण होणार?; भाजपच्या मराठमोळ्या नेत्याचं नाव आघाडीवर!
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष झाले आहेत. आयसीसीने मंगळवारी (27 ऑगस्ट) जय शाह यांची अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता जय शाह यांच्या जागी बीसीसीआयच्या सचिवपदावर कोणाची नियुक्ती होणार, याची चर्चा रंगली आहे. आयसीसीचे पद स्वीकारण्यासाठी जय शाह यांना बीसीसीआयचे पद सोडावे लागणार आहे.
अरुण धुमल-आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांना बीसीसीआयच्या सचिवपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. त्यांना बीसीसीआयमध्ये काम करण्याचा चांगला अनुभव आहे.
देवजीत सैकिया- इतरांप्रमाणे देवजीत सैकिया हे फारसे प्रसिद्ध नाहीत. मात्र, बीसीसीआय सचिव होण्यासाठी देवजीत सैकिया यांचे नाव या यादीत खूप पुढे असल्याचे मानले जात आहे.
रोहन जेटली- दिवंगत नेते अरुण जेटली यांचे पुत्र आणि दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) अध्यक्ष रोहन जेटली यांनाही बीसीसीआय सचिवपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते.
राजीव शुक्ला- बीसीसीआयचे उपाध्यक्ष आणि आयपीएलचे माजी अध्यक्ष राजीव शुक्ला यांचेही नाव सचिवपदासाठी चर्चेत आहे.
आशिष शेलार- बीसीसीआयचे विद्यमान खजिनदार आणि महाराष्ट्रातील भाजपचे नेते आशिष शेलार यांचेही नाव सचिवपदाच्या शर्यतीत दिसत आहे. आता बीसीसीआयच्या सचिवपदाची जबाबदारी कोणाकडे सोपवली जाते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.