Vastu Tips : तुळशीचं रोप उपटून काढल्यास होतात गंभीर परिणाम; जाणून घ्या सुकलेलं रोप काढण्याची योग्य पद्धत
हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाचं विशेष महत्त्व आहे. तुळशीच्या रोपाला फार पवित्र आणि पूजनीय मानण्यात आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअसं म्हणतात की, तुळशीचं रोप जर घरात वास्तूनुसार लावल्यास आणि त्याची विधिवत पूजा केल्यास भक्तांवर देवी लक्ष्मीची कृपा राहते.
त्याचबरोबर, घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच, घरात सुख-शांती आणि धन-संपदा प्राप्त होते.
ज्योतिष शास्त्रानुसार, तुळशीचं रोप लावल्याने भविष्यात येणाऱ्या अडचणी दूर करता येतात.
असं म्हणतात की, अनेकदा तुळशीच्या रोपाची योग्य काळजी न घेतल्यास तुळशीचं रोप सुकून जाते. तुळशीचं रोप जर घरात सुकलेलं असेल तर अशा वेळी काही नियम पाळणं गरजेचं आहे.
वास्तू शास्त्रानुसार, तुळशीच्या रोपाची नियमित पूजा केल्यास घरात सुख-समृद्धी नांदते.
तसेच, तुळशीचं रोप सुकल्यास त्याला उपटून घराच्या बाहेर काढू नये.
तुळशीचं रोप सूर्य ग्रहण, एकादशी, अमावस्या, चंद्रग्रहण, पौर्णिमा, पितृपक्ष या दिवशी चुकूनही उपटून काढू नये.
वास्तू शास्त्रानुसार, तुळशीचं रोप अचानक उपटून काढू नका. तर ते काढण्यापूर्वी स्नान करा तसेच त्यावर थोडं पाणी शिंपडा. यामुळे रोपातील माती काहीशी नरम होईल.
त्यानंतर, देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे स्मरण करुन ती माती हळूच काढा. तुळशीचं रोप फार पवित्र असते.त्यामुळे त्याला कचरापेटीत फेकून देऊ नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)