Anushka Sharma-Ritika Sajdeh: रोहित शर्माच्या मुलाला पाहताच अनुष्का रितिकाकडे धावत गेली; छोट्या हिटमॅनला पाहिलंत का?, PHOTO

भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने घेतलेल्या पाच बळींच्या जोरावर भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रविवारी न्यूझीलंडवर 44 धावांनी विजय मिळविला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
न्यूझीलंडविरुद्धच्या विजयासह भारताने अ गटात अव्वल स्थान मिळविले असून, 4 मार्चला पहिल्या उपांत्य सामन्यात त्यांच्यासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान असणार आहे.

दुबईत खेळवल्या गेलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंडचा सामना दुबई खेळवण्यात आला.
भारत आणि न्यूझीलंडचा सामना पाहण्यासाठी रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह आणि चिमुकला अहान देखील उपस्थित होता.
रोहित शर्माच्या मुलाचा पहिल्यांदाच फोटो समोर आला आहे.
सामन्यादरम्यान अनुष्का शर्माने रितिकाच्या जवळ जात अहानसोबत खेळताना दिसली.
अनुष्का आणि रितिकाचा या दरम्यानचे व्हिडीओ आणि फोटो सध्या व्हायरल होत आहे.
रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह हिने 15 नोव्हेंबर रोजी गोंडस मुलाला जन्म दिला.
2015 रोजी रोहित शर्माने रितिका सजदेहशी लग्न केले. त्यानंतर या जोडप्याला 2018 मध्ये गोंडस मुलगी झाली जिचे नाव समायरा असे ठेवण्यात आले.
विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध आपला 300 वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. हा सामना पाहण्यासाठी पत्नी अनुष्का शर्माने स्टेडियमवर हजेरी लावली होती. त्यावेळी अनुष्का शर्माने रितिकाची भेट घेतली होती.