In Pics : विराट-अनुष्का महाकाल देवाच्या मंदिरात, भस्म आरती करत घेतलं देवाचं दर्शन
भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली उज्जैनच्या महाकाल मंदिरात दर्शनासाठी पोहोचला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविराटदेखील पत्नी अनुष्कासोबत महाकाल देवाच्या दरबारात पोहोचला असून तिथे त्याने भस्म आरतीमध्येही सहभाग घेतला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेत आतापर्यंत तीन सामने झाले आहेत. ज्यामध्ये 2 सामने टीम इंडियाच्या नावावर आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने या सामन्यातील तिसरा सामना जिंकला आहे
त्याचवेळी, या मालिकेच्या दरम्यान, भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा महाकाल मंदिरात पोहोचला आहे.
दोघांचे मंदिरात दर्शनाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीतील पराभव आणि चौथ्या कसोटीपूर्वी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा महाकालच्या दरबारात पोहोचले आहेत.
दरम्यान विराट कोहली कसोटी फॉरमॅटमध्ये बऱ्याच काळापासून फॉर्ममध्ये नाही आणि त्याची बॅट शांत आहे. अशा परिस्थितीत महाकालच्या दरबारात पोहोचलेला कोहली आता चौथ्या आणि निर्णायक कसोटीत आपल्या बॅटने चमत्कार करेल आणि मोठी खेळी करेल, अशी आशा चाहत्यांना आहे.
2019 साली कसोटी फॉरमॅटमध्ये शेवटचे शतक झळकावणाऱ्या विराट कोहलीची फलंदाजीची सरासरीही गेल्या 20 कसोटी डावांमध्ये खूपच खराब आहे. ज्यामध्ये त्याने केवळ 25 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
यादरम्यान त्याच्या बॅटने फक्त एकदाच 50 हून अधिक धावांची खेळी पाहिली आहे, जी डिसेंबर 2021 मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यादरम्यान आली होती.
विराट कोहलीच्या तुलनेत, फॅब 4 च्या इतर 3 फलंदाजांची गेल्या 20 कसोटी डावांमधील फलंदाजीची सरासरी पाहिली तर ती खूपच प्रभावी आहे, ज्यात रुटने 66, स्मिथने 60 तर केन विल्यमसनने 59 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.