विराट, धोनी नाहीतर 'हा' आहे भारताचा सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू; 1,450 कोटींची आहे संपत्ती
जेव्हा आपण सर्वात श्रीमंत भारतीय क्रिकेटरबद्दल बोलतो तेव्हा विराट कोहलीचे नाव नक्कीच समोर येते. कोहली हा भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या फक्त टीम इंडियासाठी खेळणारे क्रिकेटपटू सर्वात श्रीमंत खेळाडूंच्या श्रेणीत येतात, कारण त्यांच्याकडे पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत.
पण टीम इंडियाचा माजी फलंदाज अजय जडेजाची संपत्ती विराट कोहलीच्या तुलनेत जास्त आहे, असे आम्ही तुम्हाला सांगितले तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. दुसरे म्हणजे, अजय जडेजाची एकूण संपत्ती एका रात्रीत 1000 कोटींहून अधिक वाढली.
खरंतर, अजय जडेजाला नुकतेच जामनगरच्या राजघराण्याचा वारस म्हणून घोषित करण्यात आले. यानंतर त्याच्या संपत्तीत अचानक वाढ झाली. रिपोर्ट्सनुसार जडेजाची संपत्ती कोहलीपेक्षा जास्त झाली आहे.
वृत्तानुसार, राजघराण्याचा वारस बनण्यापूर्वी अजय जडेजाची एकूण संपत्ती 250 कोटी रुपये होती.
वृत्तानुसार, राजघराण्याचा वारस बनल्यानंतर अजय जडेजाची एकूण संपत्ती सुमारे 1450 कोटी रुपये झाली आहे. तर कोहलीची एकूण संपत्ती 1000 कोटी रुपये आहे.