क्रिकेटविश्वात मोठी उलटफेर; दक्षिण अफ्रिकेला लोळवत अफगाणिस्तानने पुन्हा इतिहास रचला
अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना शारजाह क्रिकेट मैदानावर खेळला गेला. या सामन्यात विजय मिळत अफगाणिस्तानने आणखी एक इतिहास रचला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदक्षिण आफ्रिकेविरुद्ध 177 धावांनी विजय मिळवत अफगाणिस्तानने मालिका जिंकली आहे. अफगाणिस्तानचा एकदिवसीय क्रिकेटमधील आफ्रिकन संघाविरुद्धचा हा पहिला विजय ठरला.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा 6 विकेट्सने पराभव केला होता.
अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 312 धावांचं आव्हान दिलं होतं. अफगाणिस्तानने 50 षटकांमध्ये 4 विकेट्स गमावून 311 धावा केल्या.
अफगाणिस्तानकडून रहमानुल्लाह गुरुबाज , अझमतुल्लाह ओमरझई आणि रहमत शाह या तिघांनी सर्वाधिक धावा केल्या. तर इतरांनी छोटेखानी खेळी करत अफगाणिस्तानला 300 पार पोहचवण्यात योगदान दिलं.
अफगाणिस्तानकडून रहमानुल्लाह गुरुबाज रहमानुल्लाह गुरुबाज याने शतकी खेळी केली. रहमानुल्लाहने 110 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 105 धावा केल्या. रियाझ हसन याने 45 बॉलमध्ये 29 रन्स केल्या.
राशिद खानने 9 षटकात केवळ 19 धावा देत 5 विकेट्स पटकावल्या. राशिदने टोनी डी जोर्गी, एडन मार्कराम, ट्रिस्टन स्टब्स, कील व्हेरिन आणि विआन मुल्डर यांना बाद केले. नांगेलिया खरोटेनेही 4 विकेट्स घेतल्या. तर अजमतुल्ला उमरझाईला एक विकेट घेण्यात यश मिळाले.
312 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 34.2 षटकात अवघ्या 134 धावांत सर्वबाद झाला आणि 177 धावांनी सामना गमावला. कर्णधार टेंबा बावुमाने सर्वाधिक 38 धावा केल्या.