आयपीएलचा मेगा लिलाव 5 युवा खेळाडू गाजवणार; जोरदार पैशांचा वर्षाव होणार, दोघांवर 10 कोटींची बोली?
आगामी आयपीएल 2025 च्या स्पर्धेसाठी लवकरच बीसीसीआयकडून मेगा लिलावाचे आयोजन करण्यात येणार आहे. या मेगा लिलावत अनेक खेळाडू दुसऱ्या संघातून खेळताना दिसतील.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलिलावात अनेक युवा खेळाडूंवर पैशांचा वर्षाव होण्याची शक्यता असून खालील खेळाडूंमधील दोन खेळाडूंवर 10 कोटी रुपयांची बोली देखील लावली जाऊ शकते. यामध्ये कोणत्या खेळाडूंचा समावेश आहे, जाणून घ्या...
1. प्रियांश आर्य- प्रियांश आर्य दिल्ली प्रीमियर लीग (DPL) मध्ये दक्षिण दिल्ली सुपरस्टार्सकडून खेळत आहे. उत्तर दिल्लीविरुद्धच्या सामन्यात त्याने 50 चेंडूत 120 धावांची खेळी करून चांगलाच चर्चेत आला आहे. पण प्रियांशच्या चर्चेत येण्यामागील एक मोठे कारण म्हणजे या झंझावाती खेळीदरम्यान त्याने 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा पराक्रमही केला. प्रियांश दिल्ली प्रीमियर लीग 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज देखील आहे. प्रियांशने 9 सामन्यांमध्ये 602 धावा केल्या आहेत.
2. आयुष बदोनी- आयुष बदोनी याआधी आयपीएलमध्ये खेळला असला तरी 2022 पासून तो लखनौ सुपर जायंट्सच्या ताफ्यात आहे. ज्या सामन्यात प्रियांश आर्यने 120 धावांची खेळी खेळली, त्याच सामन्यात आयुष बदोनीने 55 चेंडूत 165 धावांची आक्रमक खेळी केली. आयुष बदोनीने दिल्ली प्रीमियर लीगमध्ये आतापर्यंत 7 सामन्यात 515 धावा केल्या आहेत. त्यामुळे आयुष बदोनीवर आयपीएलच्या मेगा लिलावात मोठी बोली लागू शकते.
3. अंगकृष्ण रघुवंशी- आयपीएल 2024 च्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने अंगकृष्ण रघुवंशीला त्याच्या मूळ किंमतीत म्हणजेच 20 लाख रुपयांना विकत घेतले होते. त्याने आयपीएलमधील पदार्पणाच्या डावात 54 धावा करून इतर फ्रँचायझींवर छाप सोडली. अंगकृष्ण रघुवंशी या मोसमात 7 डावात 163 धावा केल्या. 2022 अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक धावा (278) करणारा फलंदाज देखील रघुवंशी होता.
4. समीर रिझवी- समीर रिझवी गेल्या मोसमात चर्चेत आला कारण चेन्नई सुपर किंग्सने त्याला 8.4 कोटी रुपयांना विकत घेतले होते. समीर रिझवीला आयपीएल 2024 मध्ये बरेच सामने खेळण्याची संधी मिळाली नाही, तरीही तो UPT20 लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. समीर रिझवीने 7 सामन्यात 162.3 च्या स्ट्राईक रेटने 297 धावा केल्या आहेत.
5. आयुष सिंग-आयुष सिंग हे दिल्ली प्रीमियर लीगचे देखील योगदान आहे, जो ऋषभ पंत म्हणजेच जुनी दिल्ली 6 च्या नेतृत्वाखालील संघाचा मुख्य गोलंदाज म्हणून समोर आला. आयुष सिंगने आतापर्यंत 10 सामन्यांमध्ये 18 विकेट घेतल्या आहेत आणि लीगमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज देखील आहे.