Pitru Paksha: पितृ पक्षापूर्वी तुमच्यासोबत 'या' घटना घडल्या, तर वेळीच सावध व्हा; पितृदोषाचे संकेत तर नाहीत...!
यंदा पितृ पक्ष 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2024 पर्यंत चालेल. पतृ पक्षात आपल्या कुटुंबातील मृत्यू झालेल्या लोकांसाठी म्हणजेच, पितरांसाठी समर्पित असतो. पितृ पक्षाला श्राद्ध असेही म्हणतात. पितरांची पूजा करण श्राद्ध पक्ष अतिशय शुभ मानला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपितृ पक्षादरम्यान आपले पूर्वज पितृ लोकातून पृथ्वीवर येतात, अशी एक धार्मिक धारणा आहे. त्यामुळे या दिवसांत श्राद्ध, तर्पण, पिंडदान वगैरे करण्याची परंपरा आहे.
हिंदू पंचांगानुसार, यावर्षी पितृ पक्ष मंगळवार, 17 सप्टेंबरपासून सुरू होत आहे आणि 2 ऑक्टोबर रोजी सांगता होईल.
पितर रागावले तर पितृदोष जाणवतो, पितृ पक्षापूर्वी जर तुमच्यासोबत काही घटना घडत असतील, तर वेळीच सावध व्हा.
तुमच्या घरात पितृदोष आहे की, नाही? हे जाणून घेण्यासाठी कोणती चिन्हे आहेत ते जाणून घेऊ या...
पितृदोष हा शास्त्रामध्ये अत्यंत घातक मानला गेला आहे, त्याचे दुष्परिणाम कुटुंबातील अनेक पिढ्यांना हानी पोहोचवतात. असं म्हटलं जातं की, कामात वारंवार अडथळे येत असतील, मेहनत आणि प्रामाणिकपणा असूनही अपयश येत असेल, तर ही पितृदोषाची लक्षणं आहेत.
आकस्मित अपघातात बळी पडणं किंवा अचानक आजारपणामुळे आपले सर्व पैसे गमावणं, हे पितृदोषाचं कारण मानलं जातं. तुमच्यासोबतही असं काही होत असेल, तर पितरांच्या शांतीसाठी दान करा.
घरामध्ये काही ना काही भांडण होणं, सामान्य गोष्ट आहे, परंतु पितृ पक्षापूर्वी पती-पत्नी किंवा कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद वाढला, तर ते चांगलं मानलं जात नाही. पितृदोषामुळे घरात संकटं येतात, असं मानलं जातं.
पितृ पक्षापूर्वी घरात अचानक पिंपळाचं झाड वाढणं आणि तुळस कोमेजणं, हे देखील अशुभ लक्षण मानलं जातं. या घटनांमधून पूर्वजांची नाराजी दिसून येते, असं मानलं जातं. याचा वाईट परिणाम धन, सुख, समृद्धी आणि तुमच्या मुलांवर होतो.
पितरांची शांती आणि पितृदोषापासून मुक्ती हवी असेल, तर पितृपक्षात ब्राह्मणांना अन्नदान करा, पंचबली भोग द्या, गरजूंना दान करा.