Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शामीचा भेदक मारा, अश्विन-जाडेजाची गुगली; ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 263 आटोपला
भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात बॉर्डर गावस्कर मालिकेतील दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियममध्ये (Delhi Test) सुरु आहे. पहिल्या दिवशीचा खेळ संपला असून दिवसअखेर भारताची स्थिती 21 धावांवर शून्य बाद अशी आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारत 242 धावांनी पिछाडीवर असून कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल क्रिजवर आहे.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निवडली. ज्यानंतर त्यांचा पहिला डाव 263 धावांवर आटोपला. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा याने सर्वाधिक 81 तर हॅन्ड्सकॉम्बने नाबाद 72 धावांची खेळी केली.
भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 4 आणि अश्विन-जाडेजा जोडीने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर भारताने दिवसअखेर 21 धावा केल्या असून एकही विकेट गमावलेली नाही.
ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने 81 धावा, तसंच पॅट कमिन्सने 33 धावा केल्या. सर्वात उत्तम म्हणजे पीटर हॅन्ड्सकॉम्बने नाबाद 72 धावांची खेळी केली.
भारताकडून मोहम्मद शमीने 14.4 षटकांत 60 धावा देत सर्वाधिक 4 विकेट्स घेतले. तर अश्विन आणि जाडेजा यांनी प्रत्येकी 21 षटकं टाकत अनुक्रमे 57 आणि 68 धावा देत प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.
दिल्लीत खेळल्या जात असलेल्या भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात चार फिरकीपटूंचा समावेश केला आहे.
प्लेईंग इलेव्हनकडे पाहता कांगारू संघात नॅथन लियॉन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुहनमन हे फिरकीपटू म्हणून खेळत आहेत. त्याचबरोबर ट्रॅव्हिस हेड हा देखील अष्टपैलू फिरकी गोलंदाज आहे.
दुसऱ्या कसोटीत कांगारू संघात वेगवान गोलंदाज म्हणून फक्त पॅट कमिन्स आहे.
दुसऱ्या दिवशी भारत मोठी आघाडी घेण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल.
दिल्लीत सुरु असलेला हा सामना चेतेश्वर पुजाराचा 100 वा कसोटी सामना आहे.