कोल्हापूर जिल्ह्यातील वाटंगी, धरणगुत्ती सर्वाधिक सुंदर गाव
कोल्हापूर जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायतींना आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार जाहीर झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजिल्हास्तरीय सुंदर गाव पुरस्कार स्पर्धेत वाटंगी (ता.आजरा) व धरणगुत्ती (ता.शिरोळ) या गावांनी बाजी मारली आहे.
या गावांना 40 लाख रुपयांचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार विभागून दिल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिली.
माजी उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
तालुकास्तरावर प्रथम आलेल्या 14 ग्रामपंचायतींची मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांच्या अध्यक्षतेखाली दोन पथकाद्वारे तपासणी केली होती.
जिल्ह्यातील 2022-23 साठी गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तालुकास्तरीय पाहणी केली होती.
तालुकास्तरीय सुंदर गाव पुरस्कार योजनेत 11 गावांची निवड करण्यात आली आहे.
तालुका स्तरीय पुरस्कारासाठी 10 लाख रुपये रक्कमेचे बक्षीस देण्यात येणार आहे.
सुंदर गाव पुरस्कार योजनेसाठी गुणांकन पद्धती ग्रामस्वच्छता व्यवस्थापन, अपरंपारिक ऊर्जा आणि पर्यावरण, पारदर्शक कामकाज व तंत्रज्ञानाचा वापर, शाळा विकास या निकषांच्या आधारे केले आहे.
वाटंगी हे छोटेशे गाव असले तरी गावातील पर्यावरणपूरक उपक्रम थक्क करणारे आहेत. धरणगुत्ती हे मोठे गाव असूनही गावातील स्वच्छता, सार्वजनिक उद्यान पाहण्यासारखे असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.