न्यूझीलंडच्या पराभवाचा पाकिस्तानला फायदा, उपांत्य फेरीच्या आशा उंचावल्या
दक्षिण आफ्रिकेचा हा सात सामन्यांमधला सहावा विजय ठरला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात भारताइतकेच 12 गुण झाले आहेत. पण सर्वोत्तम नेट रनरेटच्या निकषावर दक्षिण आफ्रिकेनं अव्वल स्थानी झेप घेतली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान, पुण्यातल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं न्यूझीलंडवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. या सामन्यात क्विन्टन डी कॉक आणि रासी वॅन डेर ड्यूसेननं झळकावलेल्या शतकांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं चार बाद 357 धावांचा डोंगर उभारला होता.
त्यानंतर विजयासाठी 358 धावांचं आव्हान न्यूझीलंडला पेलवलं नाही. दक्षिण आफ्रिकेच्या प्रभावी आक्रमणासमोर त्यांचा अख्खा डाव 167 धावांत आटोपला. केशव महाराजनं चार, तर मार्को यान्सेननं तीन फलंदाजांना माघारी धाडलं.
दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा फायदा ऑस्ट्रेलियाला सर्वाधिक झालाय. ऑस्ट्रेलियाच्या संघाने गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. तर न्यूझीलंडचा संघ चौथ्या स्थानी घसरलाय.
दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडचा पराभव केल्यामुळे पाकिस्तानच्या सेमीफायनलच्या आशा अधिक उंचावल्या आहेत. पाकिस्तानसह अफगाणिस्तानच्याही सेमीफायनलच्या आशा आणखी वाढल्या आहेत. आफ्रिकेच्या विजयाचा पाकिस्तानला सर्वाधिक फायदा झालाय.