In Pics : क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आता बुद्धीबळात विश्वनाथन आनंदशी भिडणार
टीम इंडियाचा स्पिनर युजवेंद्र चहल आता बुद्धीबळात पाच वेळच्या विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदशी भिडणार आहे. भारतातील कोविड-19 संबंधी फंड गोळा करण्यासाठी बुद्धीबळाची एक मालिका आयोजित करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयुजवेंद्र चहल हा क्रिकेटपटू असला तरी त्याचे बुद्धीबळावरील प्रेम काही लपून राहिलं नाही. त्याने 6 वर्षाचे असताना बुद्धीबळ खेळायला सुरुवात केली. युजवेंद्र चहल ज्युनियर नॅशनल चॅम्पियन होता आणि 2003 साली त्याने जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व केलं.
बुध्दीबळाच्या या मालिकेत युजवेंद्र चहल सोबतच आमिर खान, रितेश देशमुख, अनन्या बिर्ला, अरजित सिंह हे देखील विश्वनाथन आनंद सोबत बुद्धीबळ खेळणार आहेत.
पुढच्या महिन्यात टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून त्या ठिकाणी तीन एकसदिवसीय सामने आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. या दौऱ्यासाठी युजवेंद्र चहलने टीम इंडियामध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे.
या आधी झालेल्या इंग्लंलविरोधातल्या टी-20 मालिकेत युजवेंद्र चहलची कामगिरी खूप काही चांगली नव्हती.