Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
In Pics : आशिया कप 2022 वर श्रीलंकेनं कोरलं नाव, विजयानंतर खेळाडूंचा धिंगाणा
आशिया चषक 2022 स्पर्धेत खराब सुरुवात होऊनही अखेरच्या सामन्यांमध्ये कमाल कामगिरी करत श्रीलंका संघाने विजय मिळवला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफायनलमध्ये श्रीलंका संघाने पाकिस्तानला 23 धावांनी मात देत आशिया चषक 2022 जिंकला आहे.
कर्णधार दासून शनाका याच्या नेतृत्त्वाखाली श्रीलंका संघाने यंदा आशिया चषकाला गवसणी घातली आहे.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेच्या संघानं 20 षटकात 6 विकेट्स गमावून पाकिस्तानसमोर 171 धावांचं लक्ष्य ठेवलं. ज्यानंतर दमदार गोलंदाजी करत श्रीलंकेनं पाकिस्तानला 147 धावांवर सर्वबाद करत 23 धावांनी सामना जिंकला.
श्रीलंकेचा स्टार अष्टपैलू वानिंदू हसरंगा याने सामन्यात अप्रतिम गोलंदाजी केली.
विजयानंतर श्रीलंकने खेळाडू अगदी मैदानातच एकमेंकाना मिठी मारु लागल्याचं दिसून आलं.
या विजयानंतर ट्रॉफीसोबत श्रीलंका संघाने दमदार असं सेलिब्रेशन केलं.
श्रीलंकेनं यंदा ट्रॉफी जिंकत सहाव्यांदा आशिया चषक जिंकला आहे. यामुळे सर्वाधिक वेळा चषक मिळवणाऱ्यांच्या यादीत भारतानंतर श्रीलंका संघ दुसऱ्या स्थानी कायम आहे.
श्रीलंका संघाची स्पर्धेची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. त्यांना पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानकडून मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. पण त्यानंतरही श्रीलंकेनं विजय मिळवत सर्वांना चकीत केलं आहे.
या विजयानंतर आता श्रीलंका आयसीसी टी20 विश्वचषकासाठी सज्ज झाली असून त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे.
16 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या आयसीसी टी20 विश्वचषक 2022 मध्ये श्रीलंका एक तगडं आव्हान नक्कीच देईल.