SBI Vs Post Office : RD स्कीममध्ये गुंतवणूक करुन मिळवा चांगला परतावा! कुठे मिळेल जास्त फायदा?
Investment Tips : जर तुम्ही स्टेट बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये आरडी अकाउंट (RD Account) उघडण्याचा विचार करत असाल, तर गुंतवणूक करण्यासाठी कोणता पर्याय उत्तम ठरेल, हे जाणून घ्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSBI Vs Post Office RD Scheme : रिझर्व्ह बँकेनं सातत्यानं रेपो दरांत वाढ केल्यामुळे बँकेतील ठेवींचे दरही (Deposit Rates) वाढले आहेत. अशा परिस्थितीत बँकेत मुदत ठेवी (Fixed Deposits) आणि आवर्ती ठेव (Recurring Deposit) योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सातत्यानं वाढत आहे. आरडी स्कीम हा सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानला जातो.
RD मध्ये दर महिन्याला छोटी रक्कम गुंतवून तुम्ही प्रचंड परतावा मिळवू शकता. आरडी योजनेची सुविधा पोस्ट ऑफिस आणि बँक या दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे. तुम्ही स्टेट बँक किंवा पोस्ट ऑफिस यापैकी कोणताही एक पर्याय निवडून आरडी खातं उघडण्याचा विचार करत असाल, तर कुठे गुंतवणूक करणं हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरु शकतो, हे आम्ही तुम्हाला सांगतो.
तुम्ही पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये तुमची गुंतवणूक 100 रुपयांपासून सुरू करू शकता. अल्पवयीन मुलाची आरडी खाती उघडण्याचाही पर्याय येथे उपलब्ध आहे. त्यांची आरडी खाती पालकांच्या देखरेखीखाली उघडता येतात.
पोस्ट ऑफिसमधील आरडी स्कीमवर 50 टक्के रकमेवर कर्ज सुविधा उपलब्ध आहे. तुम्ही हे खातं 12 महिने ते 120 महिन्यांपर्यंत उघडू शकता. या योजनेवर तुम्हाला 5.8 टक्क्यांचा व्याजदर मिळतो.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या RD योजनेमध्ये, गुंतवणूकदाराला 5.45 टक्के ते 5.65 टक्क्यांपर्यंत व्याजदर मिळतो. तसेच, बँकेकडून या योजनेवर ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्क्यांहून अधिक व्याजदर दिला जातो. जो पोस्ट ऑफिसच्या आरडीमध्ये उपलब्ध नाही.
SBI च्या आरडी स्कीममध्येही किमान 100 रुपयांची आरडी स्कीम उघडता येते. दोन्हीपैकी कोणती योजना सर्वात चांगली? जर तुमचं वय 60 पेक्षा कमी असेल, तर तुम्ही पोस्ट ऑफिस आरडीमध्ये गुंतवणूक करावी. दुसरीकडे स्टेट बँकेचे आरडी ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक फायदेशीर ठरेल.