Yavatmal News: यवतमाळ जिल्हासह शहरात दुर्गोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात
या वर्षी कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीसह अयोध्येचे राममंदिर आणि चांद्रयान,तिरुपती बालाजी, व्हॅटिकन सिटी हा कॅथेलिक शहरातील पोप या धर्मगुरूंच्या निवासस्थानासह अनेक विलोभनीय देखावे साकारण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रत्येक मंडळाने आपला वेगळा देखावा साकारण्याचा पूर्णतः प्रयत्न केला आहे. याशिवाय सामाजिक उपक्रमांवरही मंडळांनी भर दिला आहे
दुर्गोत्सव मंडळाचे 61 वे वर्ष आहे. या मंडळाने या वर्षी सर्वाधिक वेगळा देखावा साकारण्याचे काम हाती घेतले आहे
कुरुक्षेत्रातील युद्धभूमी साकारली जात आहे. यासाठी युद्ध करणारे सैन्य दल यांच्या प्रतिकृती त्या ठिकाणी तयार करण्यात येत आहेत
याशिवाय श्रीकृष्णाचे युद्धभूमीवर विराट रूप दर्शन मंडळाने साकरण्यास सुरुवात केली आहे.
सिद्धिविनायकनगरातील या दुर्गोत्सव मंडळाने देशभरातील नागरिकांच्या आस्थेचा विषय असलेल्या राम मंदिराची प्रतिकृती साकारण्याचे काम हाती घेतले आहे.
हा विलोभनीय देखावा काम पूर्ण होण्यापूर्वीच सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
बालाजी चौकातील बालाजी दुर्गोत्सव मंडळाचे 58 वे वर्ष आहे. या मंडळाने व्हॅटिकन सिटी हा कॅथेलिक शहरातील पोप या धर्मगुरूंच्या निवासस्थानाला साकारण्याचे काम हाती घेतले आहे.
हा देखावा इतका अद्भुत आहे. या ठिकाणी प्रत्यक्ष उभे राहिल्यानंतर प्राचीन इमारत असल्याचा भास होतो.
माँ एकवीरा दुर्गोत्सव मंडळाने चांद्रयान साकारण्याचे काम हाती घेतले आहे.