21 लाखांचा कोळसा जप्त, यवतमाळ पोलिसांची कारवाई
Crime News Update: यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबनच्या एसीबी इसपात कोळसा खदानातून कोळसा तस्करी करणारे आठ ट्रक जप्त करण्यात आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appही कारवाई वणी- मुकूटबन मार्गावर करण्यात आली आहे. यात आठ वाहन चालकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून हा कोळसा नेमका कुणाचा आणि ट्रॅक कुणाचे हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.
यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखा आणि वणी पोलीस ठाणे यांनी गोपानीय माहिती मिळाली की मुकुटबन येथील कोळसा खाण येथून आठ ट्रॅक मुकुटबन ते वणी रोडवर गावाजवळून पेटुर जात आहे. येथे सापळा रचून जडवाहतक अवैदय कोळशाची वाहतूक करणारे हे वाहन ताब्यात घेतले.
कोळशाच्या कागदपत्राची मागणी केली असता त्यांच्याकडे कोणतेही वैध कागदपत्रे आढळली नाहीत. या वाहनातून 260 टन कोळसा जप्त करण्यात आला आहे. या कोळशाची किंमत 20 लाख 80 हजार रुपये इतकी आहे.
8 ट्रॅक ताब्यात घेतले आहेत. या ट्रकची किंमत 2 कोटी 21 लाख रुपये इतकी आहे. यावेळी 8 वाहन चालक ताब्यात घेतले असून या ट्रॅक चे मालक कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. वणी पोलीस या बाबत अद्यापही हे कोळसा ट्रॅक कुणाचे हे ऑन कॅमेरा काहीही बोलायला तयार नसून केवळ चौकशी सुरू असल्याचे वणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदिप शिरस्कर सांगित आहे.
या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांना विचारणा केली. या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरण न्यायालयात गेले असून वेकोली अधिकारी, उप प्रादेशिक अधिकारी आणि जिल्हा खणीकर्म अधिकारी यांना हे कोळसा ट्रॅक अवैध आहे की नाही यासाठी कागदपत्रे सादर करणार आहे. या नंतर पुढचे कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.
वणी आणि मुकुटबन परिसरात असलेल्या खाजगी कोळसा खाणीतून कोट्यवधी रुपयांचा कोळसा तस्करी होत असून याकडे जाणीवपूर्वक पोलीस विभागाचे दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा वणी मध्ये सुरू आहे.
जप्त करण्यात आलेले 8 ट्रॅक वणीतील दोन कोळसा व्यापारी आणि जिल्ह्यातील एक राजकीय पक्षच्या नेत्यांचा हे आठ ट्रॅक असल्याची चर्चा आहे. मात्र पोलीस केवळ ट्रक कुणाच्या नावावर आहे. वणी परिसरातील अनेक राजकिय नेत्यांचे अवैध कोळसा तस्करीत हात काळे असून याचा तपास मात्र कोळसा तस्कर सोबत आर्थिक हित समंध मुळे शेवटपर्यंत जात नाही.