शिक्षक असावा तर असा! गावकऱ्यांची तहान भागवण्यासाठी तीन लाखांची विहीर अन् जमीनही दिली
ज्या मातीशी आपली नाळ जुळलेली असते त्या मातीचे ऋरूणानुबंध जिवानाचा अंतिम क्षणापर्यंत जुळलेले असतात. त्याच उत्तरदायित्व म्हणून तहानलेल्या गावाकऱ्यांना पाणी पाजण्याचं पुण्य एका शिक्षकाने केले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगावकऱ्याची तहान शिक्षकाला सहन झाली नाही. गावकऱ्यांची तहान भागविण्यासाठी त्यांनी आपली तीन लाख रुपये खर्चून नुकतीच खोदलेली विहीर व सभोवतालची सुमारे अडीच हजार स्केअरफुट जागा गावाला दान दिली.
यावतमाळच्या घाटंजी तालुक्यातील इंझाळा येथील सुरेश तुकाराम कस्तुरे असे त्या दातृत्वाचेधनी असलेल्या शिक्षकाचे नाव आहेत.
गावात पूर्ण दगड असल्याने विहिरीला पाणी लागत नाही,अशात नदीवरील दृषीत पाणी पिण्याची वेळ कित्येक वर्षांपासून गावकऱ्यावर आली होती.
शिक्षक सुरेश कस्तुरे यांच्या कुटुंबात सात एकर जमीन आहे. वडिलांच्या नावे तीन तर त्यांच्या नावे चार एकर शेती आहे. सुरेश यांनी नऊ महिन्यापूर्वी शेतात 30 फूट वीर खोदली. तिला भरपूर पाणी लागले बांधकामासह 3 लाख रुपये खर्चही केला घरी आई-वडील पत्नी आणि दोन मुले असे त्यांचे कुटुंब आहे. गेल्या 35 वर्षापासून ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
इंझाळा या गावात बारावी महिने पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवते. महिलांना हंडाभर पाण्यासाठी रानावनात वणवन भटकावे लागते ग्रामपंचायतच्या पाठपुराव्यानंतर गावात जलजीवन मिशन अंतर्गत दोन विहिरीचे खोदकाम करण्यात आले परंतु त्या विहिरींना पाणीच लागले नाही ही समस्या शिक्षक सुरेश कस्तुरे यांनी जाणली.
शिक्षक सुरेश कस्तुरे यांनी जागा व विहीर ग्रामपंचायतकडे दान म्हणून देत असल्याची कागदपत्रे सरपंच वैजंती ठाकरे, ग्रामसेवक अमोल जंगमवार यांच्याकडे गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थित सुपूर्द केली.
स्वतःच्या मर्यादा पलीकडे जाऊन माणुसकीच्या वलयात शिरायचे तर स्वकेंद्रित प्रवृत्तीच्या चक्रव्यूहातून बाहेर पडावे लागतं. तेव्हा देण्यामागे अथवा दानामध्ये संपन्नता येते जे काही आपण देऊ शकतो ते दिल्याने केवळ ज्याला लाभ झाला त्यालाच सुख वाटते असे नाही ज्यांनी दिले त्यालाही संतोष वाटतो हेच गुरुजी कस्तुरे यांच्या कृतीतून यानिमित्ताने दिसून आले.