Health Tips : लसूण खाणं आरोग्यासाठी गुणकारी; जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे
आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आहाराकडे सहज दुर्लक्ष होते. आणि त्यामुळे हृदय, रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या समस्या लवकर उद्भवू लागतात. कोलेस्ट्रॉल वाढणे हे देखील हृदयाच्या समस्या वाढण्याचे एक प्रमुख कारण आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढले की ते नसांमध्ये जमा होऊ लागते. यामुळे हृदयामध्ये ब्लॉकेजेस होतात आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. तरुण आणि मध्यमवयीन लोकांना कोलेस्ट्रॉलची समस्या सर्वाधिक भेडसावत आहे. अशा परिस्थितीत, खूप सावध असणे आवश्यक आहे. तुमच्या जीवनशैलीत तुम्ही काही बदल करून तुम्ही या समस्येवर नियंत्रण मिळवू शकता. तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयींमध्ये काही बदल करू शकता. यासाठी लसूण हा सर्वोत्तम उपाय आहे.
लसूणमध्ये असे घटक असतात जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. लसणामध्ये अॅलिसिन आणि मॅंगनीज असते, जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करते.
लसणात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. तसेच, अँटी-व्हायरल, अँटी-फंगल आणि अँटी-ऑक्सिडंट घटक असतात जे तुमचे शरीर फिट ठेवतात.
लसणात आढळणारे एलिसिन हे एक असे तत्व आहे जे रक्तातील ट्रायग्लिसराइड कमी करते. यामुळे कोलेस्ट्रॉलही नियंत्रित राहते.
लसणात अज्वाईन, एलिन आणि अॅलिसिन सारखी संयुगे असतात ज्यामुळे लसूण खूप फायदेशीर ठरतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.