Turkey Earthquake: भूकंपानं तुर्की हादरली; 7.9 रिश्टर स्केलचा भूकंप, मोठी जीवीतहानी, अनेक इमारती जमीनदोस्त
Turkey Earthquake: भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी तुर्कस्तान (Turkey) हादरलंय. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला असून सध्या मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुर्कस्तानमध्ये सोमवारी (6 फेब्रुवारी) भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे मोठी हानी झाली आहे.
तुर्कीमध्ये भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.8 इतकी मोजली गेली.
तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. भूकंपात अनेकांचा मृत्यू झाल्याचं स्थानिक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
तुर्कीमध्ये भूकंपानंतर मदत आणि बचावकार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखालून अनेकांना बाहेर काढलं जात आहे.
भूकंपाच्या जोरदार धक्क्यामुळे अनेक इमारती कोसळल्या आहेत. मलब्याखाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त होतेय.
दक्षिण तुर्कीत सोमवारी पहाटे 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. सायप्रस, लेबनॉन आणि सीरियामध्येही हे धक्के जाणवले.
भूकंपानंतर दक्षिण तुर्कीमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. भूकंपामुळे अनेक इमारती जमीनदोस्त झाल्यात.
यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनं म्हटलंय की, भूकंपाचे केंद्र प्रमुख शहर आणि प्रांतीय राजधानी गॅझियानटेपपासून सुमारे 33 किमी (20 मैल) अंतरावर होते.
तुर्कीमध्ये जोरदार भूकंप झाल्यानंतर त्सुनामीच्या धोक्याचं मूल्यांकन केलं जातंय.