Russia Ukraine War : किव्ह संकटात, रशिया मोठा हल्ला करण्याच्या तयारीत; सॅटेलाईटनं टिपला 'पुरावा'
Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेलं युद्ध संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय बनलं आहे. एकिकडे जगभरातील सर्वच देशांनी रशियावर कठोर निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे रशिया युक्रेनची राजधानी किव्हवर मोठा हल्ला करण्याची तयारी करत असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, बलाढ्य रशियानं चारही बाजूंनी युक्रेनला वेढलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरशियानं युक्रेनचं दुसरं सर्वात मोठं शहर खार्किववर पुन्हा ताबा मिळवला आहे. अशातच रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धा दरम्यानचे काही सॅटेलाईट फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये रशियाची अजस्त्र फौज युक्रेनची राजधानी किव्हकडे कूच करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
मॅक्सर टेक्नॉलॉजीजनं (Maxar Technologies) प्रसिद्ध केलेल्या या सॅटेलाईट फोटोंमध्ये रशियन सैनिकांचा मोठा ताफा युक्रेनमधील इव्हांकिवमध्ये दिसत आहे.
रशियन लष्कराचा ताफा 3.25 मैलांहून अधिकपर्यंत पसरल्याचं पाहायला मिळाल्याचंही मॅक्सार टेक्नॉलॉजीनं प्रसिद्ध केलेल्या या फोटोंमध्ये दिसत आहे.
अशातच आणखी एका सॅटेलाईट फोटोमध्ये रशियाच्या सैनिकांच्या वतीनं युक्रेनमधील रहिवाशी इमारतींवर डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांनंतरची विदारक परिस्थितीही दिसत आहे.
दरम्यान, रशियन संरक्षण मंत्रालयानं उघडपणे कबूल केलंय की, ते किव्हमधील नागरी भागांना लक्ष्य करणार आहेत. रशियानं आतापर्यंत युक्रेनच्या तळांवर 400 हून अधिक क्षेपणास्त्रं डागली आहेत.