Marburg Disease Outbreak : चिंता वाढली ! कोरोनापेक्षाही धोकादायक व्हायरस, 'मारबर्ग' विषाणूमुळे नऊ जणांचा मृत्यू
मध्य आफ्रिकन देशांमध्ये मारबर्ग विषाणू (Marburg Virus) पसरत आहे. हा नवा विषाणू कोरोना व्हायरस आणि इबोला व्हायरसपेक्षाही धोकादायक असल्याचं म्हटलं जात आहे. आफ्रिकेकडील देशांमध्ये सापडलेल्या नव्या विषाणूमुळे दहशत निर्माण झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमारबर्ग विषाणू कोरोना आणि इबोलापेक्षाही अधिक प्राणघातक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.
मारबर्ग विषाणूचा संसर्ग आणि प्रादुर्भावावर चर्चा करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं महत्त्वाची बैठक बोलावली आहे. दरम्यान बैठक बोलावण्याआधी WHO च्या अधिकाऱ्यांनी या विषाणू संसर्गाच्या गंभीरतेबाबत चर्चा केली होती.
आफ्रिकन देशांमध्ये मारबर्ग विषाणू संसर्ग वाढताना दिसत आहे. घानामध्ये धोकादायक मारबर्ग व्हायरसमुळे नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती WHO (World Health Organization) ने दिली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) सांगितलं की, मारबर्ग विषाणू रोग हा एक विषाणूजन्य रोग आहे. यामुळे ताप येतो आणि शरीरांतर्गत रक्तस्राव होतो. या विषाणू संसर्गाचा मृत्यू दर 88 टक्के इतका जास्त आहे.
मारबर्ग विषाणू आणि इबोला विषाणू एकाच कुटुंबातील विषाणूचे वेगवेगळे प्रकार आहेत. 1967 मध्ये जर्मनीतील मारबर्ग आणि फ्रँकफर्ट आणि सर्बियातील बेलग्रेड येथे या रोगाचा संसर्ग आढळून आला. जर्मनी आणि सर्बिया या दोन देशांमध्ये एकाच वेळी मारबर्ग विषाणूचा मोठा उद्रेक झाला.
WHO ने दिलेल्या माहितीनुसार, मारबर्ग विषाणू रोगाच्या संपर्कात आलेल्या लोकांना तीव्र ताप येतो. मारबर्ग व्हायरसमुळे 'मारबर्ग विषाणू रोग' (एमवीडी रोग) ची लागण होते. मारबर्ग विषाणू संसर्ग सुरुवातीला खाणींमध्ये किंवा रौसेटस वटवाघळांच्या गुहेत राहणाऱ्या लोकांमध्ये पसरला.
तपासणीच्या आधारे समोर आलं की, एखाद्या व्यक्तीला या विषाणूची लागण झाल्यास ताप येऊन रक्तस्राव होतो. मारबर्घ विषाणू संसर्गाचा मृत्यू दर 88 टक्के इतका अधिक आहे.
Marburg Disease Symptoms : ताप, डोकेदुखी, शरीरांतर्गत रक्तस्त्राव ही मारबर्ग विषाणू संसर्गाची लक्षणे आहेत.