Travel Tips : जगातील 5 सर्वात श्रीमंत देश... निसर्गसौंदर्य पाहून व्हाल अवाक, लोकांची एका दिवसाची कमाई तर...
आयर्लंड : यावर्षी श्रीमंत देशांच्या यादीत पहिला क्रमांक आयर्लंडचा आहे. हा खूप छोटा देश आहे पण इथे अफाट संपत्ती आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकमी लोकसंख्या आणि आर्थिक स्थैर्यामुळे आयर्लंड देश खूप श्रीमंत आहे. जगातील अनेक श्रीमंतांनी येथे गुंतवणूक केली आहे.
लक्झेंबर्ग : 2023 मधील सर्वात श्रीमंत देशांच्या यादीत लक्झेंबर्ग देश दुसऱ्या क्रमांकावर आहे. या देशाचा जीडीपी आणि दरडोई उत्पन्न आयर्लंडपेक्षा जास्त आहे.
लक्झेंबर्ग देशाचं वार्षिक सरासरी दरडोई उत्पन्न 73 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. याता अर्थ या देशातील प्रत्येक व्यक्ती दररोज सुमारे 20 हजार रुपये कमावतो.
सिंगापूर : श्रीमंत देशांच्या यादीत सिंगापूर तिसऱ्या क्रमांकावर आहे. हा एक बेट देश आहे, जिथे लोकसंख्या 59 लाख 81 हजार आहे.
अनेक वर्षांपासून गुंतवणूक आणि व्यवसायासाठी हे खूप खास आहे. जर आपण येथे वार्षिक सरासरी दरडोई उत्पन्नाबद्दल बोललो तर ते 53 लाख रुपये आहे. म्हणजे इथला प्रत्येक माणूस रोज 14,000 रुपये कमवतो.
कतार : 2023 मधील सर्वात श्रीमंत देशांमध्ये कतारचाही क्रमांक आहे. मानव विकास निर्देशांकानुसार, संयुक्त राष्ट्रांनी कतारला उच्च विकसित अर्थव्यवस्था म्हटलं आहे.
कतार देशातील दरडोई उत्पन्न 62,310 यूएस डॉलर म्हणजेच 51 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. कतारमध्ये तेल आणि वायूचे साठे आहेत.
नॉर्वे : श्रीमंत देशांच्या यादीत नॉर्वे पाचव्या क्रमांकावर आहे. या युरोपियन देशाची लोकसंख्या खूपच कमी आहे.
नॉर्वे येथील जीडीपी 82,000 डॉलर्सपेक्षा जास्त आहे. येथील सरासरी वार्षिक उत्पन्न 84,000 डॉलर म्हणजे 69 लाख रुपये आहे.