Tiger Woods : गोल्फ प्लेअर टायगर वुड्स कार अपघातात गंभीर जखमी
टायगर वुड्सने काही महिन्यांपूर्वी पीजीए टूर इवेंट, जेनेसिर ओपन एट रिवेरा कंट्ररी क्लब एट पॅसिफिक पालिसॅड्स, कॅलिफोर्निया येथे सहभाग नोंदवला होता. मात्र त्यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअपघातात त्यांच्या कारचं बरंच नुकसान झालं आहे. हा अपघात नेमका कसा झाला याची अद्याप चौकशी सुरू आहे.
लॉस एंजेलिस काउंटीमधील रँचो पालोस वेरिड्स आणि रोल्स हिल्स इस्टेट यांना वेगळे करणाऱ्या सीमेवर होते. पोलिसांनी सांगितले की, टायगर वुड्स कारमध्ये एकटे प्रवास करत होते.
लॉस एंजेलिस काऊंटी शेरीफ विभागाच्या माहितीनुसार, वूड्स स्थानिक वेळेनुसार सकाळी 7.12 वाजता हॉथोर्न बुलेव्हार्डवर जात असताना त्यांची कार ब्लॅकहॉरस रोडवर आदळली
अपघातानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
या अपघातात टायगर वुड्सला गंभीर इजा झाली आहे. लॉस एंजेलिसच्या काऊंटी शेरिफ विभागाने मंगळवारी याबाबत माहिती दिली.
: जगप्रसिद्ध गोल्फ प्लेयर टायगर वुड्स कार अपघातात थोडक्यात बचावला आहे. लॉस एंजेलिस येथे टायगर वुड्सच्या गाडीला अपघात झाला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -