श्रीलंकेत आर्थिक संकटाने अराजक! महागाईचा उच्चांक, जीवनावश्यक वस्तूंसाठी हाणामारी
श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती सध्या अत्यंत बिकट असून अनेक जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवू लागला आहे. सरकारविरोधात रोष निर्माण झाला असून नागरिकांची मोठी आंदोलने सुरू झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपेट्रोल आणि डिझेलच्या तीव्र टंचाईनंतर पंपावर फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तर आता विजेचे संकटही निर्माण झाले आहे. श्रीलंकेतील महागाईने 2015 पासूनचा विक्रमी उच्चांक गाठला आहे. भाजीपाला आणि किराणा मालाचे भाव गगनाला भिडले आहेत.
श्रीलंकेत डिझेलचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे परिणामी इथे बस आणि ठप्प झाल्या आहेत. इतकंच नाही तर वीजनिर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालत नसल्याने वीजपुरवठा खंडीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बस, ट्रेन आणि पॉवर प्लांट तसेच इतर अनेक उद्योग डिझेलचा इंधन म्हणून वापर करतात. डिझेलच्या तीव्र टंचाईमुळे उद्योग पुरेशा क्षमतेने चालू शकत नाहीत. इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पेट्रोल पंपावर लष्कर तैनात करण्यात आले आहे.
वीज खंडित झाल्यामुळे श्रीलंकेच्या कृषी क्षेत्रावरही परिणाम होत आहे. शेतकऱ्यांना विद्युत यंत्रे चालवता येत नाहीत.
श्रीलंका सरकारविरोधात जनतेत रोष वाढत असून नागरिकांची आंदोलने सुरू आहेत. राष्ट्रपती भवनालाही घेराव घालण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला.