रशिया-युक्रेन युद्धाला एक वर्ष पूर्ण, युक्रेन खंबीरपणे लढतोय; वर्षभरात काय घडलं? फोटोतून पाहा वास्तव
या दोन्ही देशांमधील संघर्षाला सुरुवात झाली असून हा संघर्ष अद्यापही कायम आहे. युक्रेन अद्यापही लढतोय, तर रशियाचा माघार घेण्यास नकार असल्याचं पाहायला मिळतंय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया युद्धामध्ये अद्याप कोणता देशाकडे झुकतं माप आहे, हे समोर आलेलं नसलं तरी या संघर्षात युक्रेनचं फार नुकसान झालं आहे. तेथील हजारो लोकांचा जीव गेला आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष मिटण्याची चिन्हं अद्यापही धुसर आहेत.
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले तेव्हा युक्रेन रशियासमोर फार काळ टिकू शकणार नाही असं वाटत होतं, पण युक्रेनने रशियासारख्या बलाढ्य देशाला कठोर झुंज दिली.
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यांमध्ये नागरिकांसह हजारो सैनिकही मारले गेले. युद्धामुळे जागोजागी विध्वंस पाहायला मिळत आहे.
याला प्रत्युत्तर देत युक्रेननंही हजारो रशियन सैनिक मारले. यामुळे पुतिन यांना टीकेला सामोरे जावे लागत आहे.
युक्रेन आणि रशिया यांच्यात जेव्हा युद्ध सुरू झाले तेव्हा बहुतेक लोकांनी झेलेन्स्की यांच्या नेतृत्वाच्या क्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. पण वर्षभरानंतरही त्यांनी नाटो देशांच्या मदतीने रशियाला कडवी झुंज दिली आहे. यामुळे लोकांचा त्यांच्यावरील विश्वास वाढला आहे.
विशेष म्हणजे जेव्हा युद्ध सुरू झाले तेव्हा प्रत्येकाला असं वाटलं होतं की, रशिया सहज युद्ध जिंकेल, पण गेल्या वर्षभराचा काळ पाहता युद्धाचा रशियालाही याचा मोठा फटका बसल्याचं दिसत आहे.
गेल्या वर्षी 24 फेब्रुवारीला रशियाने युक्रेनवर हल्ला चढवला आणि या युद्धाला सुरुवात झाली. रशिया महासत्ता आहे, तर युक्रेन छोटा देश असून मागे रशियाच्या आहे, त्यामुळे युद्ध रशिया जिंकेल, असा अनेकांचा कौल होता.
मात्र युक्रेनने शर्थीच्या प्रयत्नांसह रशियाविरुद्ध झुंजार खेळी केली आहे. रशियाने युक्रेनवर हल्ले करत ऊर्जा आणि संसाधनांना लक्ष्य केलं. काही दिवसांनंतर रशियाच्या ताब्यातील 54 टक्के भूभाग परत मिळवण्यात युक्रेनला यश आलं.
युक्रेन आणि रशिया युद्धामुळे दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. रशिया मागे हटण्यास तयार नसून सातत्याने युक्रेनवर हल्ले करत आहे. तर अनेक शहरं उद्धवस्त होऊनही युक्रेनही रणांगणात खंबीरपणे उभा आहे.
दरम्यान, युक्रेनमधील व्हायरल फोटोंमधून तेथील भयावह परिस्थितीचं वास्तव वेळोवेळी समोर आलं आहे. युक्रेनची राजधानी किव्हपासून सुमारे 37 किलोमीटरवर असणाऱ्या बुचा शहरामधील एक फोटोतून जागाजागी मृतदेहांचा खच पडल्याचा फोटो व्हायरल झाले होते.
रशिया युक्रेन युद्धाने दोन्ही देशांवर परिणाम झाला आहे. पण त्याचसोबतच जागतिक अर्थव्यवस्थेच्या समिकरणावरही याचा परिणाम झाला आहे.