PM Modi: UN मुख्यालयात पंतप्रधान मोदींची योगासने; पाहा फोटो
पंतप्रधान मोदींनी संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात 135 देशांच्या प्रतिनिधींसोबत योगा केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया योग सत्राचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश करण्यात आला आहे.
न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात 9व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभात पंतप्रधान मोदींनी मुलांसोबत ग्रुप फोटोसाठी पोझही दिली.
या खास सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांमध्ये बसून योगासने केली. यामध्ये त्यांनी विविध आसने केली. योगाचा उद्देश संघटित होणे हा असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित केलेल्या योग सत्राची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
योग दिनाच्या कार्यक्रमात विविध देशांचे नागरिकत्व असलेली लोक पहिल्यांदाच इतक्या प्रमाणात सहभागी झाले होते. हादेखील एक विक्रम आहे. त्याची दखल गिनिज बुक ऑफ रेकॉर्डसने घेतली.
पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्र मुख्यालयाच्या उत्तर लॉनमधील महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात केली.
निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी योगाच्या शक्तीचा उपयोग करूया असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
योग हा भारतातून आलाय, पण कॉपीराइट आणि पेटंट, रॉयल्टी मुक्त असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले.