Hinduism: पाकिस्तान किंवा इंडोनेशिया नाही, तर दक्षिण अमेरिकेतील 'या' देशात आहेत सर्वात जास्त हिंदू
जगात केवळ 3 असे धर्म आहेत ज्यांची लोकसंख्या ही 1 अब्जांपेक्षा अधिक आहे. ख्रिश्चन, मुस्लिम आणि हिंदू असे हे तीन धर्म आहेत. ज्यामध्ये हिंदूंची लोकसंख्या ही 1.2 अब्ज इतकी आहे. हिंदू धर्माचे लोक दक्षिण पूर्व आशियाई देशांपासून ते युरोप आणि उत्तर आणि दक्षिण अमेरिकेपर्यंत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदक्षिण अमेरिकेतील एक असा देश आहे जिथे हिंदूंची संख्या 15टक्क्यांपेक्षा जास्त आहे आणि तो देश आहे सुरीनाम.
सुरीनाम देशाचे रिपब्लिक ऑफ सुरीनाम हे अधिकृत नाव आहे. या देश दक्षिण अमेरिकेत स्थित आहे. या देशाची सीमा दक्षिणेला ब्राझीलला आणि उत्तरेला अटलांटिक महासागराला मिळते.
सुरीनाम हा धार्मिक विविधता असलेला देश आहे. जरी इथे बहुसंख्य नागरिक हे ख्रिश्चन धर्माचे असले तरीही या देशामध्ये हिंदू, मुस्लिम आणि इतर धर्मांचे देखील लोक बऱ्याच प्रमाणात आहेत.
सुरीनाम देशामध्ये 18.8टक्के लोकं हिंदू आहेत. त्यामुळे हिंदू हा दुसरा सर्वात मोठा धर्म आहे.
सुरीनाम देशाची लोकसंख्या सहा लाखांपेक्षा अधिक आहे, ज्यामध्ये हिंदूंची लोकसंख्या एक लाखापेक्षा अधिक आहे.
इथे राहणारे हिंदू हिंदी भाषा बोलतता, तसेच इथल्या अनेक लोकांचे भारताशी चांगले संबंध आहेत.
जर आपण एकूण लोकसंख्येतील हिंदूंच्या सरासरी संख्येबद्दल विचार केला तर, भारत, नेपाळ, मॉरिशस आणि संयुक्त अरब नंतर सुरीनाम हा 5 वा देश आहे, जेथे 15 टक्क्यांपेक्षा जास्त लोक हिंदू आहेत.
15 टक्क्यांपेक्षा अधिक लोक हिंदू असल्यामुळे हा देश इंडोनेशिया, पाकिस्तान आणि बांग्लादेश या देशांच्या पुढे आहे. सुरीनामामध्ये अनेक हिंदूंची मंदिरं आहेत.