No Trouser Tube Ride : 'इथे' सगळे लोक पँट न घालता का फिरतायत? आश्चर्य वाटलं ना, मग जाणून घ्या, 'हे' कारण
हे फोटो लंडन शहरातील आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलंडन शहराच्या रस्त्यांवर महिला आणि पुरुष पँटविना फिरताना दिसत आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
हे फोटो व्हायरल होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे या फोटोंमध्ये लोकांनी पँट घातलेली नाही.
या फोटोमध्ये अनेक महिला आणि पुरुष दिसत आहेत ज्यापैकी कोणीही पँट घातलेली नाही.
महिला आणि पुरुष विना पँट मेट्रोतून प्रवास करत असल्याचे व्हायरल फोटोंमध्ये दिसत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही लंडनमधील ही एक परंपरा आहे. दरवर्षी जानेवारीमध्ये ही परंपरा जपली जाते.
लंडनमधील जानेवारीत एक दिवस लोक पँट न घालता मेट्रोने प्रवास करतात. या परंपरेला 'नो ट्राउजर ट्यूब राइड' (No Trouser Tube Ride) असे नाव आहे.
या ट्रेंडची सुरुवात सुमारे 20 वर्षांपूर्वी न्यूयॉर्क, अमेरिकेत झाली होती. त्याची सुरुवात कॉमिक परफॉर्मन्स ग्रुपने केली होती.
त्यावेळी ही परंपरा विनोद म्हणून सुरू करण्यात आली होती आणि त्या काळात फक्त सात जणांनी ही परंपरा सुरू केली होती. त्यावेळी सात जण मेट्रो स्टेशनवर चढले आणि त्यांनी पँट घातली नव्हती. तेव्हापासून हा ट्रेंड जगातील इतर अनेक देशांमध्येही सुरू झाला आणि लंडनमध्येही सुरु झाला