Nepal Tour : भारतीय रेल्वेचं खास नेपाळ टूर पॅकेज, पशुपतिनाथ मंदिरासह अनेक पर्यटन स्थळांना भेट देण्याची सुवर्णसंधी
भारताचा शेजारी देश नेपाळ आपल्या सौंदर्यासाठी ओळखला जातो. जर तुम्ही नोव्हेंबर महिन्यात नेपाळला भेट देण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. (Image Source : istock)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयआरसीटीसीच्या खास टूर पॅकेजमध्ये तुम्ही दिल्ली ते नेपाळ प्रवास करू शकता. (Image Source : istock)
आयआरसीटीसी हे खास नेपाळ टूर पॅकेज पूर्ण 6 दिवस आणि 5 रात्रीसाठी आहे. (Image Source : istock)
या पॅकेजमध्ये तुम्ही काठमांडू, पोखरा सारख्या नेपाळमधील अनेक पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता. (Image Source : istock)
यामध्ये तुम्हाला दिल्ली ते काठमांडू जाण्यासाठी विमानाचं तिकीट मिळेल. (Image Source : istock)
या पॅकेजमध्ये तुम्हाला पशुपतीनाथ मंदिर, पाटण दरबार स्क्वेअर, स्वयंभूनाथ स्तूप आणि मनोकामना मंदिर पाहण्याची संधी मिळणार आहे. (Image Source : istock)
याशिवाय या पॅकेजमध्ये तुम्हाला नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची सुविधा मिळेल. (Image Source : istock)
त्याशिवाय, हॉटेलमध्ये डिलक्स रूमची सुविधाही उपलब्ध होणार आहे. (Image Source : istock)
या पॅकेजमध्ये तुम्हाला हिंदी भाषिक टूरीस्ट गाईडदेखील मिळेल. (Image Source : istock)
यासोबतच सर्व प्रवाशांना प्रवास विम्याचाही लाभ मिळणार आहे. (Image Source : istock)
या पॅकेजमध्ये तुम्ही एकट्याने प्रवास केल्यास तुम्हाला प्रति व्यक्ती 48,800 रुपये, दोन लोकांसाठी 39,800 रुपये आणि तीन लोकांसाठी प्रत्येकी 39,500 रुपये खर्च करावे लागतील. (Image Source : istock)