10 देशांमध्ये भारतीय रुपयाचा डंका, 1 लाख रुपये घेऊन गेलात तर कोट्याधीश व्हाल!

Indian Rupees : जगभरात अनेक असे देश आहेत, जिथे भारतीय चलनाची म्हणजे भारतीय रुपयाची किंमत फार जास्त आहे. अशा देशांमध्ये एक रुपयाची किंमत त्यांच्या चलनानुसार फार जास्त होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
तुम्ही जर अशा देशांमध्ये ट्रॅव्हल करण्यासाठी किंव ट्रिपसाठी जाणार असाल तर तुम्हाला स्वस्तात खूप काही फिरता येऊ शकतं. अशा 10 देशांबद्दल जाऊन घेऊयात जिथे भारतीय रुपयाची किंमत फार जास्त आहे.

व्हिएतनाम (1 रुपये = 295.6944 वियतनामी डोंग) - व्हिएतनाम मनोमोहक ठिकाणांसाठी, ऐतिहासिक स्थळांसाठी आणि तेथील वेगवेगळ्या पदार्थांसाठी फेमस आहे.
लाओस (1 रुपये = 250.77 लाओटियन किप)- लाओस दक्षिण पूर्व आशियातील एका शांततापूर्व देश आहे. येथे तुम्ही युनोस्को विश्व धरोहर स्थळ, लुआंग प्रबांगसह या देशाचं प्राकृतिक सौंदर्य पाहू शकता.
इंडोनेशिया (1 रुपये = 191.433 इंडोनेशियाई रुपया)- इंडोनेशिया हा भारतीय लोकांमध्ये लोकप्रिय असलेला देश आहे. या देशाला सांस्कृतिक वारसा आहे. डोळे सुखावणारा समुद्र, बेट आणि अनेक चांगली शहरं आहेत.
उज्बेकिस्तान (1 रुपये = 146.45 उज्बेकिस्तान सोम)- उज्बेकिस्तान या देशाला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. सिल्क रोडपासून मोहून टाकणारे वास्तूशिल्प येथे पाहायला मिळतात. भारतीय लोकांना फिरण्यासाठी हा फार स्वस्त देश आहे.
कंबोडिया (1 रुपये = 49.798883 कंबोडियन रिएल)- कंबोडिया प्राचीन इतिहास, सांस्कृतिक जीवन आणि प्राकृतिक सौंदर्याने नटलेला देश आहे. पर्यटक या देशाला नेहमी पसंती देत आले आहेत.
टांजानिया (1 रुपये = 30.04 टांजानिया शिलिंग)- टांजनियामध्ये तुम्हाला कमी खर्चात राहू शकतात. सागरी पर्यटनासाठी देखील हा देश प्रसिद्ध आहे
म्यानमार (1 रुपये = 24.184 म्यानमार क्यात)- म्यानमार हा देश प्राचीन मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे, जगभरातील अनेक पर्यटक या देशात पर्यटनासाठी येताना दिसतात.
दक्षिण कोरिया (1 रुपये = 16.94 दक्षिण कोरियाई वोन)- दक्षिण कोरिया चविष्ट पदार्थ, प्राचीन परंपरांसाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय काही पर्यटनस्थळ देखील या देशाने डेव्हलप केले आहेत.