Turkiye Earthquake: तुर्कीत मृत्यूशी संघर्ष सुरू... भारताचं 'ऑपरेशन दोस्त' देतंय जीवनदान, पंतप्रधान म्हणाले...
Turkiye Earthquake: तुर्कीतील लोकांसाठी प्रत्येक क्षण भयंकर आणि वेदनादायी आहे. अनेकांचा मृत्यूशी संघर्ष सुरू आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'ऑपरेशन दोस्त'च्या माध्यमातून आम्ही या भूकंपाच्या दुर्घटनेत एकत्र आहोत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केलंय की, आमच्या टीम 'ऑपरेशन दोस्त'चे जवान रात्रंदिवस काम करत आहेत. जीव वाचवण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करत राहतील, या संकटाच्या काळात भारत तुर्कीतील लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
तुर्कीमध्ये भारताचे 'ऑपरेशन दोस्त' काळजी, करुणा आणि मानवतेचं उदाहरण देत आहे. कठीण प्रसंगी तिथे मदत मिळाल्यानं अनेकांना जीवनदान मिळतंय. कदाचित हे मूल भारतीय मदत आणि बचाव पथकाला, धन्यवादच म्हणत असेल. (फोटो - @adgpi)
भारताच्या बचाव आणि मदत पथकानं तुर्कीच्या हाते प्रांतात 30 खाटांचे फील्ड हॉस्पिटल उभारलं आहे. भूकंपाची भीती, वेदना आणि दुखापत झालेल्या लोकांवर येथे उपचार केले जात आहेत. (फोटो - @adgpi)
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या म्हणण्यानुसार, भारतातून आतापर्यंत 6 फ्लाइट्समध्ये 250 बचावकर्ते आणि 140 टन साहित्य पाठवण्यात आले आहे (फोटो - @adgpi)
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी केलेल्या ट्विटमध्ये, इस्कंदरम, हाते येथील फील्ड हॉस्पिटलमधून एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये नूरदगीमध्ये एनडीआरएफचे शोध आणि बचाव कार्य दाखवण्यात आले आहे. भारतीय बचाव कर्मचार्यांच्या टीममध्ये 5 महिलांचाही समावेश आहे. भारताच्या NDRF टीमच्या बचाव कर्मचार्यांबद्दल तुर्कीच्या लोकांच्या डोळ्यात प्रेम आणि आशा दिसत आहे. (फोटो- @NDRFHQ)
तुर्की-सीरियामध्ये सोमवारी (6 फेब्रुवारी) झालेल्या भीषण भूकंपात 23,431 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 83,008 लोक जखमी झाले आहेत. (फोटो - @adgpi)
तुर्कीमध्ये झालेल्या भीषण भूकंपामुळे आतापर्यंत तब्बल 20 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 77711 लोक जखमी झाले आहेत. (फोटो- @NDRFHQ)
सीरियातील भूकंपामुळे आतापर्यंत 4043 लोकांना आपला जीव गमवावा लागला असून 5297 लोक जखमी झाले आहेत. तेथे बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. (फोटो - @MEAIindia)
भारताची NDRF टीम ग्राउंड झिरोवर बचाव आणि मदत कार्य करत आहे. या अंतर्गत IND-11 ने गुरुवारी (9 फेब्रुवारी) गॅझियनटेपमधील नूरदगी येथील एका 6 वर्षीय मुलीची सुटका केली. (फोटो - @MEAIindia)