Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PHOTO : चीनमध्ये औषधांचा मोठा तुटवडा, भारत करणार मदत!
चीनमध्ये (China) कोरोनाची सर्वात धोकादायक लाट आल्याने औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदररोज लाखो नवीन रुग्ण सापडत असल्याने तसेच रुग्णालयात बेड मिळत नाहीत
अशातच आता औषधांचाही तुटवडा निर्माण झाला असून, औषधांविना नागरिकांचे हाल होत आहेत
आपला शेजारी देश संकटात सापडलेला पाहून भारत (India) पुन्हा एकदा मदतीसाठी पुढे आला आहे.
भारत चीनला मदत करण्यास तयार असल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे
चीनला तापावरील औषधे पाठवण्यास भारताने परवानगी दिली आहे.
आयबुप्रोफेन आणि पॅरासिटामॉल औषधे बनवणाऱ्या कंपन्यांना चीनकडून ऑर्डर मिळत आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले,'आम्ही चीनमधील कोविड परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत
चिनी सोशल मीडिया पोस्ट आणि वृत्तपत्रातील अहवाल असे सूचित करतात की, चिनी लोक औषधांसाठी सध्या ऑनलाइन स्टोअर्सची मदत घेत आहेत.
शांघायमधील 'द पेपर' या वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, चीनमध्ये अनेक एजंट सक्रिय झाले आहेत,
जे विषाणूजन्य तापाची औषधे दुप्पट किंवा तिप्पट किमतीत विकत आहेत.
वृत्तपत्रात लिहिले आहे की, एका एजंटने परदेशी जेनेरिक अँटीव्हायरलच्या 50,000 हून अधिक बॉक्स विकले आहेत.