Beijing Flood : चीनमध्ये भीषण पूरस्थिती, राजधानी बीजिंगसह अनेक शहरं पाण्याखाली
चीनच्या हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, अजूनही पूर येण्याची शक्यता कायम आहे. यामुळे भूस्खलनही होऊ शकते. बीजिंगमधील पाच हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appडोक्सुरी वादळाचा चीनला फटका बसल आहे. यामुळे फांगशान जिल्ह्यात सुमारे 60,000 घरे बाधित झाली. नद्यांना उधाण आले आहे. सुमारे 25 वर्षांपूर्वी बांधलेल्या जलाशयाचे दरवाजे पहिल्यांदाच उघडावे लागले.
नागरिकांच्या मदत आणि बचावकार्यासाठी लष्कराची एक तुकडी आणि चार हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत.
चीनच्या अधिकृत मीडियानुसार, 1.25 लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले आहे.
चीनच्या अर्थ मंत्रालयाने बीजिंग-तियांजिन-हेबेई प्रदेशात बचावासाठी 123 कोटी रुपयांहून अधिक निधी जारी केला आहे. डोकसुरी चक्रीवादळामुळे चीनमध्ये मुसळधार पाऊस पडला आहे, जो गेल्या अनेक वर्षांत झाला नव्हता.
बीजिंगच्या आसपासच्या डोंगराळ भागांना जोडणारे 100 हून अधिक रस्ते तुटले आहेत. 52 हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. बीजिंगच्या पश्चिम भागात मेट्रो बंद झाली आहे.
सध्या बीजिंगजवळील तिआनजिन भागातील पूरग्रस्त भागातून 35 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. बीजिंग आणि आसपासच्या भागात वीज, पाणी आणि दळणवळण असा सर्वच संपर्क तुटला आहे.
बीजिंगमध्ये चार दिवसांपासून धो-धो पाऊस कोसळत आहे. या पावसाने जुलै 2012 मधील पावसाचा विक्रम मोडला आहे.