कुणी नेसल्या साड्या, तर कुणाच्या हातात ब्लाऊज; बकरी, मासे अन् बरंच काही; आंदोलकांनी लुटलं शेख हसीनांचं घर
Bangladesh Violence : सध्या संपूर्ण जगाच्या नजरा बांगलादेशकडे वळल्या आहेत. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबांगलादेशमधील अस्थिर परिस्थितीमुळे शेख हसीना यांनी निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.
बांगलादेशमध्ये शेख हसीना यांनी देश सोडल्यावर आंदोलक त्यांच्या निवासस्थाात शिरले आणि तिथे मोठा गोंधळ घातला.
पंतप्रधान आवासामधील फर्नीचर आणि भांड्यांची तोडफोड केली आणि शेख मुजिबूर रेहमान यांच्या पुतळ्याचीही आंदोलकांनी विटंबना केली.
image 7
एवढंच काय तर, आंदोलकांनी शेख हसीना यांच्या निवासस्थानातून ब्रा, मासे, साडी, ब्लाऊज, कपडे चोरले. ते एवढ्यावरच थांबले नाहीतर, त्यांनी कचऱ्याचे डब्बेही लुटले.
पंतप्रधान आवासात शिरलेल्या आंदोलकांनी मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. तसेच, शेख हसीना यांच्या कपाटातील साड्या काढून त्या स्वतः नेसल्या. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
आंदोलकांनी स्वयंपाक घराचा ताबा घेतला. तिथे बसून जेवणंही केलं. त्यानंतर त्या स्वयंपाक घरातली भांडीही जाताना घेऊन गेले.
1971 मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्ययुद्धात लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबांसाठी 30 टक्के सरकारी नोकऱ्या आरक्षित करण्याच्या मागणीसाठी गेल्या महिन्यात आंदोलन सुरू झालं होतं.
आंदोलनाचे नंतर सरकारविरोधी निदर्शनांमध्ये रूपांतर झालं. ते एवढं विकोपाला गेलं, की बांगलादेशातील वातावरण चिघळल्याचं पाहायला मिळालं.
लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान यांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर, देशभरातील उत्साही जनसमुदाय त्यांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी रस्त्यावर उतरला.