Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kamala Harris अमेरिकेच्या काळजीवाहू अध्यक्ष!
जगातील महसत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन काही दिवसांसाठी आपले सर्व अधिकार उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याकडे सोपवणार आहेत. (Photo:@joebiden/FB)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमिळालेल्या माहितीनुसार, जो बायडन कॉलोनोस्कोपीसाठी रुग्णालयात दाखल होणार आहेत. (Photo:@joebiden/FB)
त्यामुळे आपल्या पदाचे अधिकार काही काळासाठी ते उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याकडे सोपवणार आहेत. (Photo:@joebiden/FB)
व्हाइट हाऊसच्या वतीनं यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. (Photo:@joebiden/FB)
व्हाइट हाउसकडून देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार, जो बायडन शुक्रवारी आपले सर्व अधिकार काही दिवसांसाठी कमला हॅरिस यांच्याकडे सुपूर्द करतील. (Photo:@joebiden/FB)
ते पुढे म्हणाले की, बायडन प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल होणार आहेत. (Photo:@joebiden/FB)
त्यांची कॉलोनोस्कोपी करण्यात येणार असून त्यासाठी त्यांना अॅनेस्थिसिया देण्यात येणार आहे. (Photo:@joebiden/FB)
अनेस्थिसियाच्या प्रभावातून बाहेर येण्यास त्यांना काही काळ लागेल. त्यामुळे ते पूर्णपणे अनेस्थिसियाच्या प्रभावातून बाहेर येईपर्यंत राष्ट्राध्यक्ष पदाच्या सर्व जबाबदाऱ्या कमला हॅरिस सांभाळणार आहेत. (Photo:@joebiden/FB)
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती जो बायडन आणि कमला हॅरिस यांच्यात काही वाद झाल्याचं समोर आलं होतं. (Photo:@joebiden/FB)
हॅरिस यांच्या कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार, कमला हॅरिस यांचं मत गृहित धरलं जातंय, तर बायडन यांच्या कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार, कमला हॅरिस अमेरिकेतील जनेतेसोबत खेळत आहेत. (Photo:@joebiden/FB)