Washim News : वाशिममध्ये पावसाचा कहर, पावसामुळे 45 हजार 874 हेक्टर शेतपिकांचे नुकसान
वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाशिम जिल्ह्यात 5 जुलै ते 22 जुलै पर्यंत झालेल्या पावसामुळे 45 हजार 874 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
तर जिल्ह्यात एकूण 1 हजार 769 हेक्टर जमीन खरडून गेली असल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे.
यामध्ये कपाशी ,सोयाबीन,तूर, उडीद आणि मूग या पिकांचा समावेश आहे.
तर बेलोरा तालुक्या पुराचे पाणी गावात शिरल्याने लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
त्याच पार्श्वभूमीवर वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसान झालेल्या शेतांची पाहणी केली आहे.
जिल्हयात 5 जुलै ते 22 जुलै या कालावधीत झालेल्या पावसामुळे जवळपास 45 हजार 874.38 हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल मिळाला आहे.
वाशिम जिल्ह्यात 22 जुलै रोजी चोवीस तासांत सकाळी 10 वाजेपर्यंत 33 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
त्यामुळे तातडीने पंचनामे करुन मदत करण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.