Seema Haider News: सीमा हैदरने लष्कराच्या जवानांनाही पाठवली फ्रेंड रिक्वेस्ट? स्वत: कबूल केलं सत्य
शुक्रवारी (21 जुलै) सीमा हैदरने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे दयेचा अर्ज दाखल केला आणि त्यांना ग्रेटर नोएडामध्ये तिच्या 4 मुलांसह आणि सचिन मीनासह राहण्याची परवानगी देण्याची विनंती केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसीमा हैदर आणि तिचा पती सचिन मीना यांची उत्तर प्रदेश एटीएसने चौकशी केली होती. याआधी यूपी पोलिसांनी दोघांचीही चौकशी केली होती.
सैन्यातील कुणाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती का? असा प्रश्न विचारला असता सीमाने स्पष्ट नकार दिला. ती म्हणाली, मी फेसबुक वापरत नव्हते आणि माझ्याकडे माझा फोनही नाही.
सीमा म्हणाली, माझ्या फेसबुक आयडीमध्ये केवळ पाच जण होते. त्यापैकी एक सचिन होता आणि बाकीचे सचिनचे खास मित्र होते. आता माझ्या फेसबुक आयडीवर लाखो लोकांच्या रिक्वेस्ट येत आहेत आणि अनेकांनी माझ्या नावाने खोटे आयडी देखील बनवले आहेत.
सीमाला विचारण्यात आले की, नेपाळमध्ये तुम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलात, तेथे तुमची नोंद नाही? यावर सीमाने सांगितले की, हॉटेलवाल्यांनी तिला तिचे नाव विचारले नाही कारण सचिन तिच्या आधी तिथे पोहोचला होता.
सीमा हैदरला पाकिस्तानात परत जाण्याची भीती वाटते का? असाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, असं झाल्यास माझ्याबरोबर चुकीचं ठरेल, कारण पाकिस्तानमध्ये माझं भविष्य नाही. तिथे अभिमानाच्या नावाखाली लोकांना मारलं जातं. मी बलुच जमातीची आहे, ते मला सोडणार नाहीत.
सीमा पाकिस्तानातून नेपाळमार्गे भारतात आली आणि ग्रेटर नोएडामध्ये सचिन नावाच्या तरुणासोबत राहू लागली. ती तिच्या चार मुलांनाही भारतात घेऊन आली आहे.