Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Palas : निसर्गाचा अनोखा रंगोत्सव, पळसाच्या फुलांनी सृष्टी बहरली!
उन्हाळा सुरू झाला शिशिर ऋतू संपून वसंत ऋतूचे आगमन झालेला आहे या वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी पळसाची फुलं सुद्धा बहरली आहेत. (सर्व फोटो क्रेडिट - गोपाल खाडे )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया पळसाच्या फुलांचा होळीच्या सनात नैसर्गिक रंग बनवण्यासाठी सुद्धा वापर केला जातो गडद केशरी रंगाच्या पळसाच्या फुलांचे नयनरम्य दृश्य आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
ग्रामीण भागात नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी आजही पळस फुलाचा वापर केला जातो.
वाशीमच्या करंजाच्या काही भागात दुर्मिळ असलेला पिवळा पळस फुलल्याने निसर्गप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे
अंधश्रद्धेमुळे पिवळा पळस मोठ्या प्रमाणात तोडला गेला. आता पिवळा पळस दिसण दुरापास्त झाला होता.
त्यामुळे पिवळा पळसाची झलक पाहण्यासाठी निसर्गप्रेमी जंगलाकडे वळताना दिसत आहे.
पळसाच्या फुलाचे हे सौंदर्य अनेकांच्या डोळ्यात भुरळ पडत आहे.
अत्यंत कठीण परिस्थितीत ही आपण कशा पद्धतीने बहारावे यासाठी नेहमीच पळसाचे उदाहरण आपण देत असतो ज्योत ज्या पद्धतीने पेटावी त्या पद्धतीने डोंगरांमध्ये हा गडद केशरी रंगाचा पळस फुललेला दिसतोय.
आयुर्वेदातही या पळसाचं मोठं महत्त्व आहे पळस फुलांचे अनेक औषधी गुणधर्म असून या परिसरातील नागरिक या फुलांचा अनेक आजारांवर औषधी म्हणून उपयोग करतात.
मूत्र मार्गाचे विकार, त्वचा रोग अशा अनेक आजारांवर पळस फुलांचा रस गुणकारी असल्याचं या परिसरातील जाणकारांनी सांगितलं.
वैदिक काळापासून पळसाचा उपयोग यज्ञ कर्मामध्ये केला जातो, पळसाच्या फुलांचे अनेक औषधी गुणधर्म सुद्धा आहेत. (सर्व फोटो क्रेडिट - गोपाल खाडे )