Wardha News: वर्ध्यातील बापू कुटीकडे पर्यटकांचा कल, रखरखत्या उन्हातही सुमारे 16 हजार पर्यटकांची बापू कुटीला भेट
सेवाग्राम आश्रमातील बापू कुटीला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमे महिन्यात सेवाग्राम आश्रमाला भेट देणाऱ्या पर्यटकात 16 हजार 800 ची भर पडली आहे.
महात्मा गांधी यांच्या कार्याची ओळख करून घेण्यासाठी पर्यटक येथे पोहचत असतात.
रखरखत्या उन्हात वाढलेली पर्यटकांची संख्या पाहता लॉकडाऊननंतर पर्यटनासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडत असल्याचे या वाढत्या संख्येवरून दिसून येत आहे.
दोन वर्षे पर्यटन स्थळे बंद होती.पर्यटन खुले झाल्यावर 2022 च्या मे महिन्यात सेवाग्राम येथे 15 हजार 305 इतक्या पर्यटकांची नोंद झाली
2023 च्या मे मध्ये हा आकडा 16 हजार 800 इतका आहे. 2020 आणि 21 या दोन वर्षात लॉक डाऊन होते. कोरोना काळात नागरिक बाहेर पडले नाही.
त्यापूर्वी 2019 च्या मे महिन्यामध्ये 6 हजार 598 इतक्या पर्यटकांनी सेवाग्राम ला भेट दिली होती.
2017-18 मध्ये हा आकडा 7 हजारच्या संख्येत होता.
सेवाग्राम आश्रमाला भेट देण्यात तरुण पर्यटकांची संख्या देखील वाढली आहे.
पण पर्यटकांना आवश्यक असणाऱ्या सुविधांमध्ये वाढ होण्याची देखील अपेक्षा आहे.