Java Plum : गुणकारी जांभूळ, जाणून घ्या जांभळाचे आरोग्यदायी फायदे...

उन्ह्याळ्यात येणारे जांभूळ हे हंगामी फळ औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. जाणून घेऊया जांभळाचे आरोग्यदायी फायदे...

Java Plum

1/7
जांभूळ खाल्ल्याने अशक्तपणा कमी होतो तसेच पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते.
2/7
जांभूळ मधुमेहावर अतिशय गुणकारी आहे. जांभळामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
3/7
मधुमेहासोबतच रक्तदाबाचा त्रास कमी करण्यास जांभूळ फायदेशीर आहे.
4/7
पचनसंस्था सुरळीत करण्यासाठी आणि पोटाचे विकार दूर करण्यासाठी जांभूळ उपयुक्त ठरतं. जर अपचन आणि पोटदुखीचा त्रास असेल तर जांभळाचा रस प्या. त्यामुळे अपचन आणि पोटदुखीच्या त्रासापासून आराम मिळतो.
5/7
जांभूळ खाल्ल्याने आपल्या शरीरातील रक्त शुद्ध होते. जांभूळ फळामध्ये लोहाचं प्रमाण खूप असते.
6/7
जांभळाची बी पाण्यात उगाळून चेहऱ्यावरती लेप केल्याने चेहऱ्यावरती आलेल्या तारुण्यटिपिका म्हणजेच मुरुमे बरे होण्यास मदत होते.
7/7
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Sponsored Links by Taboola