Wardha News : वर्ध्यात शेतपिकांचं नुकसान, शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत
शेतीची पाहणी करण्यासाठी खासदार रामदास तडस शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबांधावर पोहचून त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
त्याचप्रमाणे त्यांनी शेतकऱ्यांशी देखील संवाद साधला आहे.
शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत जाहीर करण्यात यावी अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी केली आहे.
तसेच शासनाकडे शेतकऱ्यांना मदतीसाठीचा पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना केले आहे.
संसदेत देखील हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचं खासदार तडस यांनी सांगितले आहे.
कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार वर्ध्यात तब्बल 13 हजार 932 हेकटर शेती क्षेत्रात पिकाचे नुकसान झाले.
याचा सर्वाधिक फटका हिंगणाघाटाला बसला आहे.
हिंगणघाट तालुक्यातील कान्होली,कुंभी, अलमडोह, पिंपळगाव, वाळदुर, मणसावळी, सेलू तालुक्यातील कोटंबा, कोलगाव, येळाकेळी, सरुळ या गावांना याचा चांगलाच फटका बसला आहे.
जवळपास पाचशे बारा गावांमध्ये शेतीचे नुकसान झाले आहे.