Sahitya Sammelan 2023 : वर्ध्याच्या साहित्य संमेलनात सूत कताई करणारा चरखा पाहुण्यांच्या स्वागताला
वर्ध्यात आजपासून 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) सुरुवात झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवर्ध्यात (Wardha) होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात येणार्या प्रमुख पाहुण्यांच्या आदर सत्कारात साहित्य संमेलनात कार्य करणाऱ्या नियोजन समित्यांनी कोणतीच कसर सोडली नाही.
उद्घाटनला आलेल्या पाहुण्यांचं प्रत्यक्ष सूत कताई करणारा चरखा देऊन स्वागत केले आहे.
वर्ध्यातील गोपुरी येथील ग्रामोद्योग भांडारात हे चरखे तयार करण्यात आले आहेत
हा चरखा केवळ प्रतिकात्मक राहू नये त्यामुळे प्रत्यक्ष सूत कताई करणारा पेटी चरखा देण्यात येणार आहे.
साहित्य संमेलन अविस्मरणीय कसे होईल यासाठी मात्र आयोजक प्रयत्न करत आहेत
आजपर्यंतच्या कार्यक्रमात सत्कारात देण्यात येणाारे चरखे हे फक्त शोभेचे असायचे,
वर्ध्यातील ग्रामसेवा मंडळाने यंदा 16 बाय 8 बाय 5 या आकारातील लाकडी पेटीतील हे 25 चरखे तयार केलेले आहेत.
संमेलनाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर आहेत.
हा चरखा फक्त स्मृतिचिन्ह नसेल तर त्यावर सूत कताईही करता येणार आहे.