Gandhi Sevagram Ashram Wardha : वर्ध्याच्या ऐतिहासिक बापूकुटीच्या बचावासाठी झांज्या!
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी 1936 साली वर्ध्याच्या सेवाग्राम इथं वास्तव्यास आल्यानंतर इथल्या आश्रमातून स्वातंत्र्य चळवळीला दिशा दिली. त्यामुळं हा आश्रम महत्वाचा ठेवा आहे. आश्रम परिसरात आदिनीवास, बा कुटी, बापूकुटी, बापू दफतर, आखरी निवास निवास दिमाखात उभ्या असून अनेकांसाठी प्रेरणा आणि ऊर्जा देणाऱ्या ठरल्या आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण इथल्या कुटी ग्रामीण घरांसारखी असल्याने पावसाळ्यात त्यांची सुरक्षा आणि देखभालीची विशेष काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यापूर्वी शिंदोल्याच्या पानोळ्यापासून झांज्या आणि बोऱ्याचे ताटवे तयार केले जातात. शिवाय या झांज्या व ताटव्यांचे पावसाला सुरुवात होण्यापूर्वी आश्रम प्रतिष्ठाण परिसरातील महत्त्वाच्या चारही कुट्यासह इतरही कुट्यानंकरीता कवच बनविले जाते.
ही परंपरा महात्मा गांधीजींच्या काळापासून आजही कायम आहे. शुक्रवारपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असून कुटीना ताटव्या आणि झांज्यांचे कवच युद्धपातळीवर लावले जात आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सेवाग्राम इथल्या आश्रमातून स्वातंत्र्य चालवळीला दिशा दिली. त्यामुळं स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र सेवाग्राम होते. परिणामी या आश्रमाला मोठे महत्वही आहे. सेवाग्राम इथला महात्मा गांधी यांचा आश्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
सध्यातरी 22 झांज्या आणि 30 ताटवे तयार करून ते लावण्याचे काम सुरू आहे. कुटीच्या भिंतींना झांज्या तर वराहंड्याला बाहेरून ताटवे लावण्यात येतात. जेणेकरून भिंतीला आणि खालील मातीच्या सारवणाला पाणी लागणार नाही.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून शिंदोल्याच्या झाडाच्या पानोळ्या विकत आणाव्या लागतात. यासाठी आश्रम प्रतिष्ठानला 5 हजार पानोळ्या करीता 5 रुपये प्रमाणे पैसे मोजावे लागते.
झांज्या बनविण्यासाठी बांबूच्या कामच, शिंदोल्याच्या झाडाचे चिरे, पानोळ्या, भिंतीला अडकविण्यासाठी लाकडाच्या तयार करण्यात आलेल्या खुंट्याचा वापर केला जातो.
सेवाग्राम आश्रमातील आखरी निवास हा उंच असल्याने व व्हरांडा असल्याने फक्त या कुटीला झांज्या आणि ताटवे लावले जात नाही. त्यामुळे ही कुटी याला अपवाद ठरली आहे.अशी माहिती कारागिर शंकर वाणी आणि रामभाऊ काळे यांनी दिली आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून 5 हजाराहून अधिक पानोळ्या 5 रुपये प्रमाणे घेतल्या जातेय विकत चार कामगार दरवर्षी 30 ते 35 झांज्यांचे आच्छादन बनविण्याचे करताहेत काम, आश्रम अनेकांसाठी ठरतेय प्रेरणादायी