Cheapest Island: चार कोटींपेक्षाही कमी किंमतीत तुम्ही खरेदी करू शकता स्वतःचे आलिशान 'बेट', पाहा फोटो
आज आम्ही तुम्हाला अशाच एका बेटाची माहिती देणार आहोत, ज्याची किंमत खूपच कमी आहे. (PC: privateislandsonline.com)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्ही हे बेट मुंबई किंवा पुण्यामध्ये खरेदी केलेल्या फ्लॅटपेक्षाही कमी किंमतीत खरेदी करू शकता. कसं? ते जाणून घेऊ... (PC: privateislandsonline.com)
एका रिपोर्टनुसार हे बेट मध्य अमेरिकेत आहे. इग्वाना बेट (Iguana island) म्हणून हे ओळखले जाते.(PC: privateislandsonline.com)
हे बेट सर्व बाजूंनी निळ्या-हिरव्या पाण्याने वेढलेले असून यावरून आपण त्याच्या सौंदर्याचा अंदाज लावू शकता. या बेटवर तुम्हाला हिरवीगार झाडे आणि सुंदर दृश्य पाहायला मिळतील. निसर्गप्रेमींना हे बेट नक्कीच आवडेल. (PC: privateislandsonline.com)
इग्वाना बेटावर पाच एकर जमीन, एक घर आणि इतर गरजेच्या गोष्टी उपलब्ध आहेत. खाजगी रिअल-इस्टेट आयलंड इंकच्या वेबसाइटवर (Private Islands Inc) हे बेट विक्रीसाठी सूचिबद्ध केलं आहे. (PC: privateislandsonline.com)
या वेबसाइटवरील जाहिरातीनुसार, इग्वाना आयलंडमध्ये (Iguana island) तीन बेडरूम आणि दोन-बाथरूम असलेले घर आहे. (PC: privateislandsonline.com)
ज्यामध्ये रॅपराउंड पोर्च, डायनिंग रूम, बार आणि लिव्हिंग एरिया आहे. यासोबतच बेटाच्या दुसऱ्या बाजूला कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त निवास व्यवस्था बांधण्यात आली आहे. हे एका अमेरिकन विकसकाने अत्याधुनिक तंत्रज्ञानासह बनवले आहे. (PC: privateislandsonline.com)
वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, येथे एक स्विमिंगपूल आणि हेलिपॅड बनविण्याची तयारी सुरू आहे. (PC: privateislandsonline.com)
बेटाच्या पश्चिमेला मासेमारीचे क्षेत्रही आहे. याव्यतिरिक्त ऑन-साइट व्यवस्थापक आणि केअरटेकरसह बेट क्रू देखील इग्वाना बेटाच्या नवीन मालकांसाठी काम करणे सुरू ठेवण्यास उत्सुक आहेत. (PC: privateislandsonline.com)
हे बेट खरेदी करण्यासाठी केवळ 376,627 पौंड म्हणजेच 3.76 कोटी रुपये द्यावे लागतील. याबाबत अधिक माहिती तुम्ही privateislandsonline.com या वेबसाइटला भेट देऊन मिळू शकतात. (PC: privateislandsonline.com)