Photo: सलग दुसऱ्या सत्रात शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांना फायदा
शेअर बाजारात आजही तेजी, Sensex 390 अंकांनी तर Nifty 112 अंकांनी वधारला.
Share Market Updates
1/9
शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात वाढ झाल्याचं दिसून आलं. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये आज 390 अंकांची वाढ झाली.
2/9
आज राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये आज 112 अंकांची वाढ झाली.
3/9
सेन्सेक्समध्ये आज 0.64 टक्क्यांची वाढ होऊन तो 61,045 अंकांवर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 0.62 टक्क्यांची वाढ होऊन तो 18,165 वर पोहोचला.
4/9
आज शेअर बाजार बंद होताना मेटल आणि कॅपिटल गुड्सच्या शेअर्समध्ये आज मोठी खरेदी झाल्याचं दिसून आलं. मेटल इंडेक्समध्ये आज 2.4 टक्के तर कॅपिटल गुड्स इंडेक्समध्ये 1.4 टक्क्यांची वाढ झाली.
5/9
बँक आणि फार्मा इंडेक्समध्येही आज प्रत्येकी 0.5 टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून आलं.
6/9
दुसरीकडे सार्वजनिक बँकांच्या निफ्टीमध्ये आज 1.2 टक्क्यांची घट झाल्याचं दिसून आलं. बीएसई मिडकॅप इंडेक्समध्ये 2.4 टक्क्यांची वाढ झाली.
7/9
आज बाजार बंद होताना Hindalco Industries, Tata Steel, Larsen and Toubro, UPL, आणि HDFC कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली.
8/9
Tata Motors, HDFC Life, UltraTech Cement, Adani Enterprises, आणि BPCL कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घट झाली.
9/9
मंगळवार आणि आज, या दोन सत्रांमध्ये गुंतवणूकदारांनी चांगलाच फायदा कमावल्याचं दिसून आलं.
Published at : 18 Jan 2023 06:09 PM (IST)