Worlds Expensive Water : एक बॉटल पाण्याची किंमत आलिशान घराएवढी, जगातील सर्वात महागडं पाणी
सर्वसामान्य माणसे साधे किंवा आरोचं पाणी पितात. काही लोक फुकटच तर काही लोक विकतच पाणी पितात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसेलिब्रिटीज आणि खेळाडू त्यांक्ती त्याची गरज आणि उपलब्धता लक्षात घेता बाहेरील देशातूनही पाणी आयात करतात. या पाण्याची किंमतही त्यांच्या ब्रँडनुसार अधिक असते.
तुम्ही जगातील सर्वात महाग पाण्याबद्दल ऐकलं आहे का. या पाण्याची किंमत ऐकून तुम्हाला चांगलाच धक्का बसेल. या महागड्या पाण्याच्या 700 मिली पाण्याच्या किंमतीमध्ये तुम्ही चक्क एक आलिशान घरंही घेऊ शकता.
ॲक्वा डी क्रिस्टलो ट्रिब्यूटो ए मोदिग्लिआनी (Acqua di Cristallo Tributo a Modigliani) हे जगातील सर्वात महागडं पाणी आहे. या पाण्याचं बॉटलचं नाव 2010 मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंदवण्यात आलं होतं.
या एका बॉटलमधील 750 मिली पाण्याच्या किंमतीत तुम्ही आलिशान घर घेऊ शकता. या 750 मिली पाण्याची किंमत सुमारे 60000 डॉलर म्हणजे 44 लाख रुपये होती.
जगातील सर्वात महागडं पाणी फ्रान्स (France) किंवा फिजी (Fiji) देशामध्ये मिळतं. मीडिया रिपोर्टनुसार, या पाण्यामध्ये 5 ग्रॅम सोन्याचं भस्म मिसळलं जातं. हे सोनं शरीरासाठी खूप फायदेशीर असतं.
ॲक्वा डी क्रिस्टलो ट्रिब्यूटो ए मोदिग्लिआनी (Acqua di Cristallo Tributo a Modigliani) या पाण्याची बॉलटही या पाण्याप्रमाणेच खास आहे.
या पाण्याची बॉटल फार आकर्षक असते. ही बॉटल सोन्यापासून बनवलेली असते. ही बॉटल लेदर पॅकेजिंगपासून तयार केलं जातं. या बॉटलच डिझाईन Fernando Altamirano ने तयार केलं होतं.
या ब्रँडच्या अनेक प्रकारच्या पाण्याच्या बॉटल आहेत. सर्वात कमी किंमतीच्या बॉटलची किंमत 285 डॉलर म्हणजे सुमारे 21,355 रुपये एवढी असते.
हे पाणी भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंब म्हणजे अंबानी कुटुंबातील सून निता अंबानी ही पितात, असं सांगितलं जातं. हे पाणी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.