केवळ झाडपाला अन् किडे नाही, दगडही खातात 'हे' पक्षी; कारण जाणून चकित व्हाल
Ostrich Eat Stones : पक्षी झाडे आणि किटक खाऊन जीवन जगतात. पण, एक पक्षी असा आहे, जो फक्त झाडपाला आणि किडे नाही, तर दगडंही खातो. हे ऐकून तुम्हीही चकित झाला असाल, पण हे खरं आहे. (Image Source : istock)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशहामृग हा सर्वात वेगाने धावणारा पक्षी आहे, हे सर्वांनाच माहित आहे. पण या पक्षासंबंधित आणखी एक मनोरंजक गोष्ट आहे. ती म्हणजेच शहामृग पक्षी खडे आणि दगडही खातात.(Image Source : istock)
सध्या सोशल मीडियावर शहामृग पक्ष्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो दगड खाताना दिसत आहे. (Image Source : istock)
शहामृग पक्षांना दगड खाताना सर्वच चकित झाले आहे. पण त्यामागचे कारण अधिकच आश्चर्यकारक आहे.(Image Source : istock)
एका व्हायरल व्हिडीओमध्ये अनेक शहामृग दगड खाताना दिसत आहेत. त्यांच्यासमोर अनेक दगड ठेवलेले असून, ते धान्याप्रमाणे दगड चोचीने उचलून खात आहेत.
शहामृग दगड का खात आहेत, दगड खाल्ल्याने त्यांच्या पोटाला इजा होणार नाही का? यामागचं कारण समोर आलं आहे.(Image Source : istock)
अमेरिकन ऑस्ट्रिच फार्म्स वेबसाइटनुसार, शहामृग हे सर्वभक्षक आहेत, म्हणजेच ते प्राणी आणि वनस्पती दोन्ही खातात. (Image Source : istock)
इतर अनेक पक्ष्यांप्रमाणे शहामृगांना दात नसतात. यामुळे ती जे काही खाते, ते पचवताना त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या कारणास्तव ते अन्न पचवण्यासाठी दगड खातात. (Image Source : istock)
शहामृग दगड खाऊन ते पोटातील पिशवीत साठवतात, ज्याला गिझार्ड म्हणतात. शहामृग जे काही अन्न खातात, ते या दगडांच्या मदतीने अन्न सहज पचते.(Image Source : istock)
शहामृग पक्ष्यांना दात नसतात. त्याऐवजी त्यांच्याकडे गिझार्ड आहे. हा एक कठीण स्नायुंचा बोरा असतो, ज्यामध्ये दगड असतात. हे दगड आपल्या दातांप्रमाणेच त्यांचे अन्न चिरडतात. नंतर हे अन्न पचवले जाते.(Image Source : istock)
शहामृगाच्या पोटातील दगड देखील हळूहळू लहान होऊन नष्ट होतात. मग ते पुन्हा दगड खातात. (Image Source : istock)