Pune news : वय विसरुन पुण्यात ज्येष्ठ नागरिकांची उत्साहात रॅली...
आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठांच्या विविध समस्याबाबत जनजागृती करण्यासाठी पुण्यात एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसहयोग फाऊंडेशन आणि पुना जेरियॅट्रीक केअर सेंटर याच्यातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
विविध ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, महाविद्यालयीन विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते.
जंगली महाराज रोडवरील संभाजी उद्यान ते डेक्कन बस स्थानक या मार्गावर रॅली काढण्यात आली.
समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे आणि ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर निकेत कासार यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला.
येत्या काळात भारतात ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढणार आहे. त्याच सोबत त्यांच्या समस्याही वाढणार आहेत. मात्र त्या सोडवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली.
मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर निकेत कासार यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन करतांना भारतीय मुल्य व्यवस्थेचा दाखला दिला. मात्र बदलत्या जागतिक परिस्थितीत विभक्त कुटुंब पद्धतीत आई वडिलांना सोडून दुर रहाणाऱ्या मुलांमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
तसेच तरुण पिढीने या संदर्भात गांभिर्याने विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.